दि.८ मुळशी : वार्ताहर :
पिरंगुट : मुळशी तालुक्यातील उरवडे येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली. उरवडे येथील क्लोरिफाईड कंपनीत ही आग लागली. या दुर्घटनेत 18 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. संबंधित कंपनीचं नाव एसव्हीएस अक्वा टेक्नॉलॉजिस असं आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. उरवडे (ता. मुळशी) येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस अक्वा टेक्नॅालॅाजिस या रासायनिक कंपनीला आज (ता. 07) दुपारी भीषण आग लागली. यामध्ये 18 कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 15 महिला आहेत. 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 15 दिवसांपुर्वी देखील या कंपनीला आग लागल्याची माहिती येथील स्थानिक देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज 41 कामगार कामावर उपस्थित होते. 18 कामगार हे एसी लावून आतमध्ये माल पॅक करीत होते. त्यांची खोली बंद असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे या आगीत त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या आगीत मंगल नागु आखाडे (खरावडे), सीमा बोराटे (बीड), संगीता गोंदे (मंचर), सुमन ढेबे (खरावडे), संगीता पोळेकर (घोटावडे फाटा), महादेवी अंबारे (सोलापूर), सारिका विलास कुदळे, सुरेखा तुपे (करमोळी) यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मंगल आखाडे यांचा कामाचा आजचा पहिला दिवस होता. हा पहिलाच दिवस दुर्देवाने आय़ुष्याचा शेवटचा दिवस ठरला. सुत्रांच्या माहितीनुसार, एसव्हीएस कंपनीत सॅनिटायझर तयार करण्याच काम सुरू होते. सॅनिटायझर बनविण्याचे काम सुरू असताना कंपनीला अचानक आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दल शर्थींचे प्रयत्न करत आहे.