डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे; प्रभाग ९ मध्ये प्रचाराची रणधुमाळी…

पिंपरी, चिंचवड :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये निवडणूक प्रचाराने प्रचंड वेग घेतला असून, राजकीय वातावरण तापले आहे. या प्रभागातून निवडणूक रिंगणात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांनी “निवडणुकीत दमदार कामाचाच निकाल लागतो” असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. अनुभवी नेतृत्वासोबत सक्षम आणि कार्यक्षम पॅनल मैदानात उतरल्याने लढतीची सुरस अधिकच वाढली आहे.

प्रभाग ९ मध्ये सध्या गल्ली-वस्तीपासून मुख्य चौकांपर्यंत प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. पदयात्रा, घरभेटी, कोपरा सभा आणि थेट संवादाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच उमेदवार करत असले, तरी डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांचा प्रचार कामाच्या ठोस मुद्द्यांवर आधारित असल्याने तो वेगळा ठरत आहे. “मी जे बोलते ते करून दाखवते, आणि जे केले आहे तेच मतदारांसमोर मांडते,” असे त्या ठामपणे सांगतात.

डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांनी महापौरपदाच्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. पायाभूत सुविधा मजबूत करणे, रस्ते विकास, पाणीपुरवठा सुधारणा, स्वच्छता मोहिमा, आरोग्य सेवा बळकट करणे, तसेच महिला व बालकल्याणासाठी प्रभावी योजना राबवण्यात त्यांचा पुढाकार राहिला. शहराच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन ठेवत त्यांनी प्रशासनावर ठसा उमटवणारे निर्णय घेतले, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.

या निवडणुकीत अनुभवी नेतृत्वासोबत स्थानिक प्रश्नांची जाण असलेला सक्षम पॅनल उभा राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत असून, “एकसंघ पॅनल – भक्कम विकास” हा संदेश घरोघरी पोहोचवला जात आहे. संघटित ताकद आणि अनुभव यांचा मिलाफ प्रभागाच्या भविष्यासाठी आवश्यक असल्याचे मत अनेक मतदार व्यक्त करत आहेत.

प्रभागातील नागरी समस्या, वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांबाबत डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांनी स्पष्ट आराखडा मांडला आहे. “महापौर असताना शहराचा विकास केला, आता प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे,” असे त्या म्हणाल्या.

एकूणच प्रभाग क्रमांक ९ मध्ये प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, कामाचा ठोस अनुभव, विकासाची विश्वासार्ह कामगिरी आणि सक्षम पॅनलच्या जोरावर आपण निश्चितपणे निवडून येऊ, असा आत्मविश्वास डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *