पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) :– पवना धरण १०० टक्के भरल्यामुळे शनिवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये पवनामाईचे जलपूजन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, सुनिल ऊर्फ बाबू कांबळे, प्रविण शिर्के, विनय लोंढे,संतलाल यादव, सुरज साळवे, देवा भालके, जितेंद्र गवळी, दिलीप देहाडे,संतोष जराड, गणेश शिंदे आदी पत्रकार उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे म्हणाले की,” पवना धरण १०० टक्के भरल्यानंतर जलपूजन करण्याची परंपरा आहे. मागील तीन वर्षांपासून महापालिकेचा कारभार अधिकारी वर्ग चालवतात, लोकप्रतिनिधी नसल्याने परंपरा खंडित होऊ नये या उद्देशाने पत्रकारांनी गेली चार वर्षांपासून जलपूजन करण्याची परंपरा चालविली जात आहे.

मागील पंधरा दिवसापूर्वी पवना धरण पूर्ण भरले मात्र गणेश उत्सवाच्या व्यस्त कामामुळे जलपूजन करण्यास उशीर झाला आणि दि.१३ सप्टेंबर रोजी जलपूजन करण्यात आले. पवनामाई वर्षभर पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवण्याचे अतिमहत्वाचे काम करते त्याचीच उताराई म्हणून आणि पवनामाईचे आदरातिथ्य राखले जावे या उद्देशाने जल पूजनाचे आयोजन करण्यात येते. पवना धरणातील जलाचे पूजन पुष्पहार,श्रीफळ वाहून करण्यात येत असल्याचे ही श्री गोरे यांनी सांगितले. पवनामाई जलपूजनानंतर पत्रकारांनी जलविहाराचा आनंद घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *