पिंपरी :- पिंपळे गुरव येथे गेल्या दहा वर्षापासून पुरुष वटपौर्णिमा मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या  वतीने होत असते पण हे वर्ष आपवाद ठरले आहे कारण शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी पुरुष वटपौर्णिमा यावर्षी होणार नाही म्हणून कार्यकर्ते व नागरिकांना संदेश दिला पण घेतलेला वसा कोणत्या परिस्थितीत बंद करायचा नाही असा निर्णय घेतला.

स्त्री पुरुष समानतेसाठी वटपौर्णिमा साजरी करण्याचा पायंडा बंद पण झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही दोघा पती-पत्नी वटपौर्णिमा साजरी केली असे आण्णा जोगदंड म्हणाले पुढे ते म्हणाले की,कोणताही कार्यक्रम घ्यावयाचा म्हटले की नियोजन आणि ताणतणाव येतोच यावर पर्याय म्हणून शहरातील पहिले पती-पत्नी गुणवंत कामगार असलेले दापत्य अण्णा जोगदंड व संगीता योगदान दोघांनी फेऱ्या मारून वटवृक्षला फेऱ्या मारून पुरुष वटपौर्णिमा साजरी केली फक्त स्त्री पुरुष समानतेसाठी वटपौर्णिमा साजरी केल्याचे त्यांनी सांगितले .कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा मुळीच हेतू नाही असे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यावेळी सांगितले. त्यांनी महिलांना आवाहन केली आहे, की झाडांच्या फांद्या तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करू नये असा मौलिक सल्ला त्यांनी दिला .

यावेळी गुणवंत कामगार संगीता जोगदंड म्हणाल्या की मला अभिमान वाटतो माझे पती यांनी माझ्या बरोबर एकसाथ  फेऱ्या मारून वटपौर्णिमा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *