पिंपरी(प्रतिनिधी) दि.२१ एप्रिल २०२५ : पुणे–मुंबई महामार्ग अरुंद करून वाहतूक कोंडी करणाऱ्या अभियंता बापू गायकवाड व सुनील पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शिखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे की,पिंपरी चिंचवड पालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाचे सहज शहर अभियंता बापू गायकवाड आणि कार्यकारी अभियंता सुनील पवार यांनी पुणे मुंबई हा रस्ता मोठा अरुंद असलेला रस्ता अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली अरुंद केला आहे हे करत असताना यांनी आरटीओ आणि वाहतूक विभागाची परवानगी घेतली नसल्याने रोजच वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे वाहतूक नियोजन विभागाचे सहस्रहर अभियंता बापू गायकवाड आणि कार्यकारी अभियंता सुनील पवार यांच्यावर कडक कारवाई करा व झालेला खर्च या दोघांकडून वसूल करा
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तात्कालीन आयुक्त दिलीप बंड असताना बावीस वर्षांपूर्वी पुणे मुंबई रस्ता रुंदीकरण केले त्यासाठी दापोडी व निगडी व्यापाऱ्यांच्या दुकाने मिळकती जबरदस्तीने ताब्यात घेतल्या व्यापाऱ्यांचे करोडो आर्बो रुपयांचे नुकसान करण्यात आले व रस्ता रुंद करण्यात आला मात्र बापू गायकवाड आणि कार्यकारी अभियंता सुनील पवार यांनी आर्थिक फायद्यासाठी अर्बन स्ट्रीट जबरदस्तीने लोकांवर लादला व त्यामुळे पुणे मुंबई रस्ता अक्षरशा अरुंद करण्यात आले त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली. सहज शहर अभियंता बापू गायकवाड आणि सुनील पवार यांच्यावर कडक कारवाई करा यांना पालिकेतून त्वरित बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी ही वाघेरे यांनी केली आहे.