पिंपरी( प्रतिनिधी)- साप्ताहिक माझी सखी सोबतीच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने “स्त्री शक्ती २०२५” या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवर महिला सखींच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले, यावेळी सर्वाचे स्वागत विशेष अंकाच्या संपादिका सायली कुलकर्णी यांनी केले.
अंजू सोनवणे,शुभांगी जाधव, कमल सोनजे, शिल्पा आठवले, तृप्ती शहा,मीना जावळे, चारुलता जोशी, इत्यादीचा सन्मान करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता अनघा पाठक, संध्या वाघ, जाहिरा मोमिन, वैशाली ननावरे, महापालिका अधिकारी स्वीय सहायक सौ सुनिता पळसकर मॅडम,वैशाली गायकवाड, सौ मनीषा कामथे मॅडम, पत्रकार, श्रद्धा प्रभुणे,अर्चना मेंगडे, मंदा बनसोडे, महापालिकेच्या छाया ढोक अलका वढणेआणि शीला सूर्यवंशी हेमा शिंदे महिला कर्मचारी इत्यादी मान्यवर महिला सखीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पिंपरी चिंचवड महानगर पालिका मुख्य इमारत मधील भा. वि. कांबळे पत्रकार कक्षामध्ये पार पडलेल्या प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार अरुण उर्फ नाना कांबळे, बापूसाहेब गोरे, सुनील उर्फ बाबू कांबळे, प्रवीण शिर्के, विनय लोंढे, दिनेश दुधाळे, विनायक गायकवाड इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.