पिंपरी प्रतिनिधी : पिंपरी येथील नगरसेवक संदीप वाघेरे आयोजित पिंपरी करंडक २०२४ भव्य डे–नाईट क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या क्रीडांगण येथे आमदार अण्णा बनसोडे व नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या हस्ते तसेच शीतल शिंदे, किरण मोटे,प्रसाद शेट्टी, चंद्रकांत नखाते,मीना नाणेकर,निकिता कदम,प्राचार्य पांडुरंग भोसले,शिवाजी वाघेरे,शशिकांत घुले,प्रदीप भोसले यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास बोलताना वाघेरे म्हणाले कि, आठ दिवस या भव्य अशा नवमहाराष्ट्र महाविद्यालयाचा क्रीडागणावर या स्पर्धा सुरु आहेत.या स्पर्धाला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद पाहता हे सलग पाचवे पर्व आहे.समाजासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबावणे हे मी माझे कर्तव्य समजतो. दहीहंडी, 10 वी 12वी मध्ये विशेष गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, रावण दहन, घरगुती गणपणी विसर्जनासाठी हौद बांधून सोय करणे, हे आपले वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सुरु आहेत.
याचबरोबर सतत विविध प्रकारची काम करत असताना ज्या नागरिकांनी मला शहरात सर्वात जास्त मतांनी निवडून दिल त्यांच्या सोयी सुविधा साठी मी कुठंही कमी पडणार नाही याची मी सतत जाणीव ठेवतो. आपल्याला माहित आहे की कुठल्याही देशाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेलं स्थान हे त्या देशाच्या संस्कृती आणि क्रीडा मधील यशावर अवलंबून असत.संस्कृतीमध्ये आपण कुठेच मागे नाही उलट इतर अनेक देशांनी आपली भारतीय संस्कृती स्वीकारली आहे.
परंतू क्रीडा विभागात आपली कामगिरी सुमार दर्जाची राहिलेली आहे.ऑलिम्पिक मधील अमेरिका चायना, जपान, अस्ट्रॉलीया या देशाच्या तुलनेत आपण खूप मागे पडत आहोत.
आपल्याकडे सगळ्या प्रकारची गुणवत्ता असूनही आपण सातत्यपूर्ण गोष्टीचा अभावामुळे मागे पडतो.सर्व प्रकारच्या खेळातून खेळाडू निर्माण झाले पाहिजेत त्यांना योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे राजआश्रय मिळाला पाहिजे ही माझी भावना आहे. म्हणून मी सतत प्रयत्न करत असतो.
यावेळी प्राधिकरण येथील ईश्वरी अवसरे यांची अंडर 19 वर्ल्ड कप साठी निवड झाल्याबद्दल आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करीत उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
दि.२१ डिसेंबर ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भव्य डे – नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण ८८ संघांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेमध्ये खुल्या गटातील कै.सौ.सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रक्कम रुपये १,५१,०००/- व चषक संदीप कापसे युवा मंच पिंपरी , कै.सौ.सविता सुभाष वाघेरे यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रक्कम रुपये १,००,०००/- व चषक नामदेव ढाके स्पोर्ट्स फौंडेशन वाल्हेकरवाडी ,कै.श्री. दत्तोबा हरीशेठ वाघेरे यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रक्कम रुपये ५१,०००/- व चषक स्वराज्य क्रिकेट क्लब काळेवाडी तसेच कै. श्रीमती रंगूबाई निवृत्ती कुदळे यांच्या स्मरणार्थ चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक रक्कम रुपये २५,०००/- व चषक स्वराज्य क्रिकेट क्लब ऊर्से मावळ या संघांनी पटकावले तसेच ४० वर्षावरील खेळाडूंसाठीच्या स्पर्धेमध्ये कै.श्री योगेश पोपटराव वाघेरे यांच्या स्मरणार्थ प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रक्कम रुपये ३५,०००/- व चषक कै. संतोष जाधव क्रिकेट क्लब, तसेच कै.संतोष नामदेव जाधव यांच्या स्मरणार्थ द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रक्कम रुपये २५,०००/- व चषक, कै. निलेश गुलाबराव सोनवणे यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रक्कम रुपये १५,०००/- व चषक व कै. राजेश शंकर गायकवाड यांच्या स्मरणार्थ चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक रक्कम रुपये ११,०००/- व चषक या संघांनी पटकावले तसेच महिला क्रिकेट संघांमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रक्कम रुपये ७०००/- व चषक पुणे वॉरियर्स संघ पुणे व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रक्कम रुपये ५०००/- व चषक चंद्रोस क्रिकेट संघ वल्लभ नगर यांना देण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन संदीप वाघेरे युवा मंचचे श्री संदीप नाणेकर,राजेंद्र वाघेरे, गणेश मंजाळ, सारथी काळे,राघवेंद्र भांडगे तर सूत्रसंचालन नरेश ढुमे यांनी केले