पिंपरी – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, पिंपरी चिंचवड विभाग यांच्या वतीने आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये प्रथमच श्री स्वामी समर्थ महाराज, परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र आदरणीय श्री नितीन भाऊ मोरे यांच्या उपस्थितीमध्ये दि. 29 डिसेंबर 2024, रोजी स. ८ पासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत समीर लॉन्स, भोंडवे वस्ती, रावेत, पुणे या ठिकाणी भव्यदिव्य श्री सरस्वती पूजन व विद्यारंभ संस्कार सोहळ्याचे आयोजन खास करुण विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे संयोजक यांनी सांगितले. या कार्यक्रम साठी प्रवेश विनामूल्य आहे.