पिंपरी – उद्या दिनांक ६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या हस्ते व महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पिंपरी विधानसभेचा जाहीरनामा ऑनलाइन प्रकाशित होणार आहे तरी सर्वांनी त्रैलोक्य लॉन,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी दापोडी या ठिकाणी उपस्थित रहावे.
त्यानंतर ठीक दुपारी ११:३० वाजता पिंपरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतिचे अधिकृत उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ फिरंगाई देवीचे दर्शन घेऊन दापोडी गावातील प्रचार फेरीला सुरुवात करणार आहोत तरी भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,रिपाई (आठवले) सर्व मित्र पक्षाचे सर्व आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे.