पिंपरी ता. ३ : आगामी विधानसभा निवडणूकीला गट-तट, नाराजी विसरून महाविकास आघाडी एकदिलाने सामोरे जाऊन तीनही जागांवर विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार केल्याची माहिती पत्रकार परिषदेत शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह घटक पक्षातील नेत्यांनी केला.
पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेला उद्धव ठाकरे पक्षाला एकही जागा न मिळाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांत नाराजी होती. त्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस या घटक पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (ता. ३) पिंपरीत संयुक्त बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. या बैठकीनंतर तीनही पक्षातील नेत्यांनी संयुक्तिक पत्रकार परिषद घेऊन माध्यमाशी संवाद साधत याबाबत माहिती दिली.
यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सचिन अहिर, आमदार गौतम चाबुकस्वार, सुलभाताई उबाळे, माजी महापौर संजोग वाघेरे, सुनील गव्हाणे, तुषार कामठे, रवी लांडगे, केसरीनाथ पाटील, तुषार साने, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिंचवडचे उमेदवार राहूल कलाटे, भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे, पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा शिलावंत, माजी नेताजी काशिद, दत्तात्रय वाघेरे, कल्पना शेटे यांच्या सह शिवसैनिक व घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिक्रिया
पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाची ताकत असूनही एकाही जागेवर उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांत नाराजी होती. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत नाराजी दूर झाली असून आता आम्ही एकदिलाने विधानसभा निवडणूकीला सामोरे जाणार आहोत.
– सचिन अहिर
उपनेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
मी मनापासून शिवसेननेचे आणि विशेषत: सचिन अहिर साहेबांचे आभार मानायला तेवढे कमी आहेत
त्यांनी सर्व शिवसैनिकांनी आघाडीचा धर्म पाळावा म्हणून विशेष प्रयत्न केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकजुटीने आणि एकदिलाने काम करून पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही जागा बहूमताने जिंकातील हे नक्की आहे.
– डॉ. अमोल कोल्हे
खासदार राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष