पिंपरी, दि. ०८ : आगामी विधानसभा निवडणुकीत पैलवान दीपक सौदागर रोकडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळवून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत. नुकताच त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे.

पिंपरी चिंचवड शहराचा बेस्ट सिटी, कामगारांची उ‌द्योगनगरी म्हणून नावलौकिक असला, तरी इतर भागाच्या मानाने पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. झोपडपट्टी पुनर्वसन विकास, रस्ते, पिण्याचे पाणी, रखडलेले एस.आर.ए. प्रकल्प, वाहतूक कोंडीची समस्या असे अनेक प्रश्न न सुटल्याने पिपरीला इतर भागांच्या तुलनेत मागासलेपण आलेले आहे. है प्रश्न सोडविण्याला आपले प्राधान्य असणार आहे. याचबरोबर निर्भय व सुदृढ निरोगी समाज घडविण्यासाठी व्यसनमुक्ती, तरुणांना खेळाकडे वळवून सुदृढ व निर्भय समाज उभारणीसाठी काम करायचे आहे. स्वच्छ नियमित पाणी पुरवठा, आरोग्य, महापालिका शाळांचा गुणात्मक दर्जा सुधारण्यासाठी काम करायचे आहे. विधानसभा है निमित्त आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासात खारीचा वाटा उचलायचा आहे. हे काम अविरत पुढे सुरूच राहणार आहे. पिंपरी विधानसभा निवडणुकीस मी इच्छूक आहे. मला संधी मिळाल्यास या संधीचे सोने मी नक्कीच प्रयत्न करीन. याचचरोबर पक्षश्रेष्ठीनी पक्षातील अन्य कुणाला संधी दिल्यास त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून पक्षाचा उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

पै. दीपक रोकडे यांचा अल्पपरिचय :
मराठवाड्‌यातील धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर हे दीपक रोकडे यांचे मूळ जन्मगाव तर कर्मभूमी पिंपरी, पिंपरी येथूनच त्यांनी बी. कॉम. पर्यंतचे महाविद्‌यालयीन शिक्षण पूर्ण केले. वडील सौदागर रोकडे है व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टरसह खाजगी कंपनीत नोकरीस होते. आई सुवणो गृहिणी आहे. विद्यार्थी दशेपासूनच रोकडे यांनी पर्यावरण, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती जनजागृती, स्वच्छता अभियान, वृक्ष संवर्धन या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून कामास सुरुवात केली. माणस जोडत त्यानी पिपरी चिंचवड व सपूर्ण जिल्ह्यातून नवभारत युवक विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवकांची मोठी फळी उभी केली आहे. याचबरोबर बुस्ट एज्युकेशन सोसायटीचे ते संचालक आहेत. शैक्षणिक क्षेत्रात बस्ट एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्यांचे मोठे योगदान आहे. निसर्ग धरा पर्यावरण संस्थेचे ते अध्

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *