-अरुंद रस्ते, स्ट्रॉम वॉटर लाईन, भाजी मंडई, हॉकर्स झोनचा फज्जा…
-व्यावसायिकांची नाराजी ‘परिवर्तन’ घडविणार…
भोसरी 17 सप्टेंबर (प्रतिनिधी)
भोसरी गावठाणातील अरुंद रस्ते वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरतात. स्ट्रॉंम वॉटर लाईनचे काम कागदोपत्रीच केल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही. जागोजागी पाणी साठते . दहा वर्षांपूर्वी बांधलेली भाजी मंडई धूळखात पडून आहे . तर दुसरीकडे हॉकर्स झोनचा देखील फज्जा उडालेला आहे. गेल्या दहा वर्षातील या परिस्थितीमुळे भोसरी गावठाण परिसराला अक्षरशः बकाल स्वरूप आले असल्याची टीका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली .
भोसरी गावठाण भागातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना रविवारी (दि १५) स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी भेट दिली. मंडळाच्या बाप्पांची आरती करत त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला. यावेळी भोसरी गावठाण आणि गव्हाणे वस्ती परिसरातील 32 गणेश मंडळांना अजित गव्हाणे यांनी भेट दिली . पठारे लांडगे तालीम, लांडगे लिंबाची तालीम, गव्हाणे तालीम, फुगे माने तालीम, मधले फुगे तालीम, कै. दामूशेठ गव्हाणे मित्र मंडळ , लोंढे तालीम, भगवान गव्हाणे मित्र मंडळ, छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, जय बजरंग मित्र मंडळ, लोंढे आळी आणि माळी आळी या मंडळांना भेट देण्यात आली. यावेळी अण्णासाहेब मगर बँकेचे संस्थापक बाळासाहेब गव्हाणे, पवना बँकेचे संचालक सुनील गव्हाणे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती शिंदे, माजी स्वीकृत नगरसेवक नंदकुमार शिंदे, युवा नेते गोरख गवळी, तुषार फुगे, मल्हारी गवळी, अमर फुगे, राम फुगे, विराज लांडे, राजाभाऊ गव्हाणे, संजय आप्पा गव्हाणे, स्वप्निल फुगे, जयेश गव्हाणे, आनंद गव्हाणे, आदित्य आव्हाळे, विनोद गव्हाणे, सम्राट फुगे हर्षवर्धन माने, अरुण गव्हाणे, कैलास गव्हाणे, आकाश गव्हाणे, निलेश फुगे, नवनाथ रसाळ, सचिन कंद, अतुल शिंदे, संजय गव्हाणे, शंकर लोंढे, अभी ढगे विक्रम गव्हाणे आदी उपस्थित होते.
अजित गव्हाणे म्हणाले, या भागात विजेची या भागात मोठी समस्या आहे . डीपींची दुरुस्ती देखभाल वेळेवर केली जात नाही. त्यामुळे अनेकदा खंडित विजेची समस्या उद्भवते. पाणी टंचाईची समस्या देखील या भागामध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. दिवसाआड पाण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मात्र ते पाणी देखील कमी दाबाने मिळते. त्यामुळे बऱ्याचदा येथे कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल होतात. या भागातील स्ट्रॉंम वॉटर लाईनचे काम योग्यरीत्या झालेले नाही. अनेक ठिकाणी तर स्ट्रॉंम वॉटर लाईन कागदावरच राहिलेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात या भागात पाण्याचा निचरा होत नसल्याची समस्या प्रकर्षाने जाणवली. अनेकदा रस्त्यावरच पाणी साठलेले दिसून आले. त्यामुळे गेल्या दहा वर्षात नियोजनाचा निव्वळ खेळखंडोबा करण्यात आल्याचे दिसून येत आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे. आगामी काळात स्ट्रॉंम वॉटर लाईन, गावठाणातील रस्त्यांचे योग्य नियोजन, शास्त्रशुद्ध पद्धतीने या रस्त्यांची बांधणी, महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार हॉकर्स लाभार्थ्यांना गाळे मिळवून देणे यांसारख्या कामांना प्राधान्य देणार असल्याचे अजित गव्हाणे यांनी यावेळी नागरिकांना सांगितले.
———————–
व्यावसायिकांची प्रचंड नाराजी-
भोसरी गावठाण या भागाचा पीसीएमटी चौक हा रहदारीचा मुख्य रस्ता आहे. हा भाग अतिक्रमणांमुळे अरुंद झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या आहे. येथे हॉकर्स झोनचे कोणतेही नियोजन न केल्यामुळे पथारी, हातगाडी व्यावसायिकांना वारंवार पालिकेच्या अतिक्रमण कारवाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे या व्यावसायिकांची येथील आमदारांवर प्रचंड नाराजी आहे. भोसरी गावठाणातील दहा वर्षांपूर्वी बांधलेली भाजी मंडई अद्यापही धुळखात पडून आहे. येथील ओटा धारकांना तुटक्या, गळक्या, अपुऱ्या जागेत असलेल्या भाजी मंडईत सध्या व्यवसाय करावा लागतो. मात्र गेल्या दहा वर्षात भाजी मंडईतील गाळे वाटप करण्यात आले नाही.