पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्युनियर इंजिनियर्स असोसिएशनची वार्षिक बैठक गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी पार पडली या बैठकीमध्ये सुनील बेळगावकर यांची असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

तसेच कार्याध्यक्ष- चंद्रकांत कुंभार, सचिव संतोष कुदळे, सहसचिव- विपिन थोरमोठे, खजिनदार- महेंद्र देवरे, सह खजिनदार सचिन मगर तसेच महासंघाचे प्रतिनिधी पदी अभिमान भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. वरील सर्व पदाधिकाऱ्यांचे व संचालक मंडळाचे सर्वांनी स्वागत व हार्दिक अभिनंदन केले.

सर्व निवड प्रक्रियेतील पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्युनियर इंजिनिअर असोसिएशन मध्ये आनंद व उत्साह पूर्ण वातावरणाने संपूर्ण बैठक कार्यक्रम पार पडला, सर्व स्तरातून सुनील बेळगावकर यांचे अभिनंदन व स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *