पिंपरी :- सध्या जगभर गाजत असलेल्या “चंदू चॅम्पियन” या पिक्चरचे रियल हिरो पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांची आज (गुरुवारी) सायंकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांनी विशेष निमंत्रित करून त्यांना शासकीय गाडी पाठवून बंगल्यावर आदरातिथ्य केले. पिंपरी चिंचवडचे (थेरगाव) रहिवासी असलेल्या पेटकर यांच्या जीवनावर असलेल्या चंदू चॅम्पियन या चित्रपटाने शंभर कोटी रुपयांच्या व्यवसायापर्यंत झेप घेतली आहे. एका मराठी माणसाच्या जिद्दीची व आत्मविश्वासाची कहाणी असलेला हा चित्रपट आहे. युद्धात गोळ्या लागून कायमचे अपंगत्व आल्यानंतरही ऑलिंपिक मध्ये गोल्ड मेडल मिळवलेल्या साहसवीराची ही कहाणी आहे. राज्यातील सर्व आमदारांसाठी एका विशेष शो चे आयोजन लवकरच आपण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *