पुणे :  प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात येत्या सोमवारी (दि. २२ जानेवारी) विराजमान  श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याने संपूर्ण देश राममय झाला असून, हा आनंदसोहळा साजरा करण्यासाठी आज प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन केले असून सांळूखे विहार येथून  कौसर बाग, कोंढवा, पुणे येथील राम दरबार मंदिर  (संकट हरण महादेव मंदिर) पर्यंत भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आतिशबाजी करित नाचत जल्लोष साजरा करण्यात आला. या प्राण प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन पवन बन्सल, नरेंद्र गोयल, माजी नगरसेवक तानाजी लोणकर केले असुन यावेळी पवन चमाडिया, गुंजन नवल, अरविंद जैन, माजी आमदार महादेव बाबर आदी उपस्थित होते.

प्राण प्रतिष्ठा महोत्सव अंतर्गत दुपारी 12.00, थेट प्रक्षेपण  दाखविण्यात आले. दुपारी ४ वाजता कलश यात्रा साळुंके विहार ते  माता मंदिर रामदरबार मंदिर पर्यंत काढण्यात आली ज्यात शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता. तसेच  संध्याकाळी ५ वाजता भजन, संध्याकाळी ६ वाजता हजारो दिव्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात आला. अयोध्येतील शरयूतीरी महा आरती आणि प्रसादाचे आयोजन केले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *