पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज शाश्वत विकास कार्यशाळेचे आयोजन वाकड येथील हॉटेल टीप टॉप इंटरनॅशनल येथे करण्यात आले यावेळी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेस आमदार उमा खापरे, ज्येष्ठ संपादक संजय आवटे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, बाळासाहेब गलबले, मनोज सेठिया, प्रमोद ओंभासे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपायुक्त अजय चारठाणकर, विठ्ठल जोशी, सुभाष इंगळे, रविकिरण घोडके, विविध विभागांचे विभागप्रमुख, क्षेत्रिय अधिकारी, शाखाप्रमुख तसेच जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पॅलेडियम कन्सलटिंग इंडिया प्रायव्हेट लिमीटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित पतजोशी, सी. एस. आय. आर. कंपनीचे राकेश कुमार, पुणे नॉलेज क्लस्टरच्या सी. ओ. ओ. डॉ. प्रिया नागराज, सी. ई. पी. टी. चे मुख्य डॉ. दिनेश मेहता, आय. एफ. सी. चे मोहित गणेरीवाला, ज्ञानप्रबोधिनीचे एन. डी. सावंत, सी. पी. सी. व्ही चे क्षेत्रिय संचालक भरत शर्मा, जे. आय. झेड कंपनीचे पर्यावरण तज्ञ सिद्धांत मन्होत्रा, मानदेशी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतना सिन्हा उपस्थित होते.
