पिंपरी :- महानगरपालिकेचे पाठबळ असले की काय घडू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पिंपळे गुरव येथील काळुराम जगताप जलतरण तलाव येथे समर स्विमिंग कोचिंगचा दि 16 जून 2023 रोजी संपन्न झालेला प्रमाणपत्र वितरण सोहळा. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भारताचे पहिले प्यारा ओलंपिक विजेते व जागतिक विक्रमवीर व पद्मश्री पुरस्कार प्राप्त मुरलीकांत पेठकर यांनी भूषवले.

त्यांच्या हस्ते या सोहळ्यात दीडशे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गाचे कौतुक केले ते म्हणाले, महानगरपालिकेने जलतरण तलाव उपलब्ध केल्यामुळे समर स्विमिंग सारख्या प्रोफेशनल कोचेसना एक खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो आणि त्यातूनच भविष्यातील चांगले जलतरणपटू व जीव रक्षक तयार होऊ शकतील.

माननीय आमदार अश्विनीताई जगताप व पिंपरी चिंचवड क्रीडा विभागा ती प्रशासकीय अधिकारी यांच्याच सहकार्यामुळे भविष्यात पिंपरी चिंचवड मधील एखादा जलतरणपटू नक्कीच ऑलम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात आणि भारताला मेडल मिळवून देऊ शकतात असा विश्वास श्री पेटकर त्यांनी व्यक्त केला.

माननीय कै. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कार्यातून प्रत्येक विद्यार्थ्यांना क्रिडा विभागात प्राधान्य राहिले त्यातून प्रेरणा घेऊन अश्विनीताई जगताप यांच्या पाठबळामुळेच स्विमिंग सारख्या विषयांमध्ये पुणे महानगरपालिकेच्या तलावावर निर्भर न राहता पिंपळे गुरव पिंपरी चिंचवड येथील काळूराम जगताप तलाव प्रमाणे सर्व तलावात याचप्रमाणे असंख्य विद्यार्थी घडो यासाठी मा. महापौर माई ढोरे तसेच स्थानिक सर्व नगरसेवकांसह श्री. शशिकांत कदम व अमरनाथ कांबळे हे नगरसेवक कार्यरत आहेत. मला नेहमी हे सर्व सहकार्य करत राहतात असे या समर स्विमिंग व्हेकेशन च्या संचालिका सौ. विद्या समाधान कदम म्हणाल्या.

पेटकरसरांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना खूप मोठी प्रेरणा मिळाली आणि भविष्यात आपणही स्विमिंग मध्ये ऑलम्पिक विजेते होऊ शकतो असा विश्वास मिळाला. तसेच सरांनी यावेळेस आश्वासन दिले की विद्यार्थी घडवण्यासाठी जी काही मदत लागेल ते ती करण्यास तयार आहेत.

याप्रसंगी या क्लासच्या संचालिका सौ. विद्या कदम यांनी पण श्री. पेठकर म्हणल्या प्रमाणे याचे संपूर्ण श्रेय पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री. शेखर सिंह तसेच श्री. जितेंद्र वाघ व क्रीडायुक्त श्री. मनोज लोणकर यांना दिले व त्यांच्या प्रति या सर्वांच्या प्रति आभार व्यक्त केले.

याप्रसंगी सौ. कदम यांनी प्रशासनातील इतर क्रीडा अधिकारी जसे की शीतल मारणे, जयश्री साळवी, अनिता केदारी यांचेही आम्हाला बहुमूल्य सहकार्य लाभले याचा आवर्जून उल्लेख केला. व कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सदर संस्था ही केवळ लक्ष्मण भाऊंच्या स्पोर्टच्या प्रेरणेमुळे निर्माण झाली व आमदार अश्विनताई जगताप यांच्या खंबीर नेतृत्वाचे पाठबळ आम्हाला कायम आहे व राहील अशी अशा व्यक्ती केली.

यावेळेस अनेक पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, श्रीमती पाटील म्हणाल्या समर स्विमिंग येथे क्लास केल्यामुळे आमच्या मुलांची पाण्याची भीती गेली तसेच त्यांना उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण या क्लास तर्फे दिले जाते कारण असे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी पिंपरी चिंचवड मधील मुलांना पुण्यातील टिळक टॅंक किंवा बालेवाडी येथील टॅंक येथे जावे लागत असे पण या क्लासमुळे हे प्रशिक्षण आमच्या चिंचवड मध्ये उपलब्ध झाले आहे. श्रीमती मधुलिका विश्वास म्हणाल्या आज आमच्या मुलाला स्विमिंग करताना बघणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंददायक गोष्ट आहे, कोचेसचे व्यवस्थित शिकवणे पाहून आम्हाला आमच्या मुलांना ऍडव्हान्स स्विमिंग (जीव रक्षक) चे प्रशिक्षण शिकवायचे आहे, तसेच विद्यार्थीही मनमोकळेपणाने स्टेजवर येऊन सांगत होते की समर व्हेकेशन चे सर्व प्रशिक्षक हे उत्कृष्ट स्विमिंग प्रशिक्षित आहेत व ते सर्व सहज व सोप्या पद्धतीने अलगद पाण्या तरंगायला व पोहायला शिकवतात त्यांच्यामुळे आम्ही खूप छान स्विमिंग करायला शिकलो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती राधिका घोडके यांनी अत्यंत उत्तम रीतीने केले तसेच, क्रीडा शिक्षक श्री रवींद्र कांबळे यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *