पिंपरी, 5 नोव्हेंबर 2022 : – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड च्या जनरल मॅनेजर (इन्फ्रास्ट्रक्चर) पदी सह शहर अभियंता मनोज सेठिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत पिंपरी चिंचवड महानगपालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी आदेश जारी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग , महाराष्ट्र शासन यांचेकडील प्रतिनियुक्तीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये रुजू झालेले सह शहर अभियंता अशोक भालकर यांना पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडकडील जनरल मॅनेजर इन्फ्रास्ट्रक्चर या पदावर नियुक्ती देण्यात आलेली होती. श्री. अशोक भालकर यांची पदोन्नतीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण , पुणे येथे बदली झाल्याने जनरल मॅनेजर इन्फ्रास्ट्रक्चर हे पद रिक्त झाले होते.

रिक्त जनरल मॅनेजर इन्फ्रास्ट्रक्चर पदी सह शहर अभियंता (स्थापत्य) मनोज सेठिया यांना नियुक्ती देण्यात आलेली असून पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडकडील कामकाज सोपविण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *