पिंपरी : मोशी येथील तापकीर नगर मधील साईकृपा कॉलनीमध्ये सांडपाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बंदिस्त गटार लाईन नसल्यामुळे तेथील रहिवाशी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या डेंगी, मलेरिया सारख्या आजाराने शहरात थैमान घातले आहे. अनेक नागरिक आजारी पडत आहेत, त्या ठिकाणाहून जाणारे मैला मिश्रित पाण्यासाठी गटार लाईन टाकण्यासाठी खाजगी जागेतून जावे लागते, यासाठी खाजगी जागा मालकाचा विरोध आहे आणि हे न्यायप्रविष्ठ प्रकरण झाल्यामुळे पालिकेने पर्यायी जागेची निवड करून त्या ठिकाणाहून बंदिस्त गटर लाईन टाकण्याची मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती चे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर म्हणाले की न्यायप्रविष्ठ प्रकरण आहे असे सांगून पालिकेने पळ न काढता ताबडतोब उपाययोजना कराव्यात, भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21 नुसार जीविताच्या हक्कात स्वच्छ व आरोग्यदायी पर्यावरणाचा मूलभूत हक्कांचा समावेश होतो. याचा पालिकेने  गांभीर्याने विचार करून पर्यायी व्यवस्था करावी.

महिला अध्यक्षा सौ मीना करंजावणे म्हणाल्या कि, केंद्र सरकारच्या स्वच्छता क्रमवारी पिंपरी चिंचवड शहराचा देशात 19 वा तर राज्यात चौथा क्रमांक लागला आहे. तर 10 लाख ते 40 लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या विभागात सर्वोत्तम अभिप्राय बद्दल देशात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळाला आहे ,ही तर पिंपरी चिंचवड शहरासाठी भूषणावह आहे, पण याच शहरात आरोग्याच्या प्रश्नासाठी आरोग्य विभाग तेवढ्याच ताकतीने ड्रेनेज लाईनचा का प्रश्न सोडवत नाहीत असा प्रश्नही महिला अध्यक्ष मिना करंजवणे यांनी विचारला आहे. पालीकेचे आरोग्य विभागासह आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी या नागरी समस्या कडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी मानवी हक्क संरक्षण जागृतीचे जागृतीच्या वतीने आयुक्ताकडे केली आहे.

स्थानिक नागरिक अहमद मुजावर ,शिरसाट कालिदास,अशोक हडवले,ज्ञानेश्वर गोरे, यांनी वेळोवेळी पालिकेकडे पत्राव्यवहार पण केलेला आहे असे समजले. यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे अध्यक्ष विकास कुचेकर, शराध्यक्ष आण्णा जोगदंड , पश्चिम महिला अध्यक्षा सौ संगीता जोगदंड, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा मीना करंजवणे, उपाध्यक्ष विकास शहाणे, मुरलीधर दळवी, गजानन धाराशिवकर यांच्या सहया आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *