पिंपरी :- “डाॅ. रामचंद्र देखणेसरांची प्रतिमा व प्रतिभा प्रचंड मोठी होती. त्यांनी लोककला व आध्यात्मामध्ये संपुर्ण जीवन समर्पित केले यामुळे मोठी येथे असलेल्या संतपीठाला डाॅ.रामचंद्र देखणे संतपीठ हे नाव देण्याबाबत विचार व्हावा !” असे विचार संवेदनाचे प्रकाशक नितिन हिरवे यांनी व्यक्त केले. कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी व्यक्त केले.
पिंपरीचिंचवड साहित्य मंच आणि शब्दरंग साहित्य कट्टा या संस्थांनी मिळून डाॅ. देखणे सरांच्या श्रध्दांजलीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. शैलेजाताई म्हणाल्या “वर्षभर आठवणीत राहील असे उपक्रम साहित्यिकांनी राबवावे. त्यांना योग्य ते सहकार्य करू.” चंद्रशेखर जोशी म्हणाले “देखणेसर देवलोकांना आनंदित ठेवण्यासाठी गेले असावेत.”
प्रकाश ढवळे म्हणाले, “लोकसाहित्याच्या सोबत शाहिरांसाठी सुद्धा देखणेसरांनी प्रचंड काम केले आहे.” नाना शिवले म्हणाले, ” त्यांचे वाङमय हा भविष्याचा ठेवा आहे.”
सलिमभाई शिकलगार म्हणाले,”देखणेसरांच्या विचाराची जपवणूक व्हावी.” राजेंद्र घावटेंनी आपल्या वक्तव्यातून सागितले,” प्राधिकरणातील सर्व पेठांना पवित्र नद्याचे नाव देण्याची संकल्पना देखणे सरांची होती. शिवाजीराव शिर्के म्हणाले, ” देखणे हे आधुनिक संत होते. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.” या प्रमाणे बाबू डिसोजा यांनी ४८ वर्षापूर्वीचा देखणे सरांचा सहवास कथन केला. देखणे सरांचे भाचे सचिन गटणे यांनी लहानपणीच्या आठवणीतून कसे घडलो हे सांगितले.
या व्यतिरिक्त अशोक कोठारी, सूर्यकांत मुथियान, प्रमोद पवार, कैलास भैरट, नागेश चव्हाण, सुप्रिया सोळूंकुरे, बळीराम शेवते, आनंदराव मुळीक, नरहरी वाघ, माधुरी डिसोजा, पी.बी.शिंदे, शिवाजी जगताप, सुभाष भंडारे, प्रा.नुतन आपटे, मधुश्री ओव्हाळ यांनी डाॅ.देखणेंच्या आठवणींना उजाळा दिला.
तसेच दिलिप देशमुख, प्रकाश निर्मळ, इत्यादी मान्यवर हजर होते.
शोकसभेचे आयोजन अश्विनी कुलकर्णी यांनी तर सुत्रसंचालन राज अहेरराव यांनी केले.
