पिंपरी : पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणारा भा.वी.कांबळे आदर्श पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ संपादक शिवाजीराव शिर्के यांना प्रदान करण्यात आला आहे. आज रविवारी दि. २६ रोजी सावित्रीबाई फुले हॉल, पिंपरी येथे झालेल्या कार्यक्रमात मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पिंपरी चिंचवड आणि परिसरात पत्रकारितेचे बीज रुजवण्यासाठी भावी कांबळे यांनी प्रयत्न केले त्यांच्या बरोबरच शिवाजीराव शिर्के यांनी सुद्धा या भागात आदर्श पत्रकारिता केली. आज वयाच्या ७६ व्या वर्षी सुद्धा ते चांगल्या पद्धतीने पत्रकारिता करीत आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांच्या अध्यक्षतेखाली आज पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, सोशल मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, आयबीएमचे गोविंद वाकडे, ज्येष्ठ पत्रकार नाना कांबळे, सरचिटणीस प्रवीण शिर्के, सोशल मीडिया अध्यक्ष सूरज साळवे, अविनाश आदक, विजय जगताप तर महिला अध्यक्षा शबनम सय्यद, श्रावणी कामत, अर्चना मेंगडे, सीता जगताप, रोहित खर्गे, देवा भालके, प्रशांत साळुंखे, गणेश मोरे, प्रविण कांबळे, अनिल भालेराव, विनायक गायकवाड, गौरव साळुंखे, मुझफ्फर इनामदार, रामदास तांबे, अशोक कोकणे, राम बनसोडे, राजू वारभूवन, डॉ. देविदास शेलार, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्हा संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, परिषद अध्यक्ष शरद पाबळे, प्रमुख विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

एस. एम. देशमुख म्हणाले की, भा. वी. कांबळे यांनी पिंपरी चिंचवड पत्रकारितेला एक नवा आयाम दिला. शिवाजीराव शिर्के यांनी त्यांना खंबीर साथ दिली. त्यांचा सन्मान हा यथोचित आहे. त्याच बरोबर या पुढे भा.वी. कांबळे यांच्या नावाने पुरस्कार पुणे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणारा असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय सचिव नाना कांबळे यांनी केले. सूत्र संचालन मारुती बाणेवार यांनी केले तर आभार माधुरी कोराड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *