पिंपरी (दिनांक : ३१ ऑगस्ट २०२२) :-पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची गणपतीची प्रतिष्ठापना पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये उत्साहात महासंघाचे अध्यक्ष बबनराव झिंझुर्डे यांच्या हस्ते आज बुधवार, दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी अकरा वाजता विधिवत पूजन करून करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष बबनराव झिंझर्डे म्हणाले की, गणपतीची रोजची आरती कर्मचारी, अधिकारी, पत्रकारांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच गणपती दहा दिवसाचा असून आदल्या दिवशी आळंदीतील वारकऱ्यांच्या दिंडीने वाजत गाजत विसर्जन होईल.

यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष मनोज माछरे, सरचिटणीस अभिमान भोसले, सहसचिव उमेश बांदल, नितीन समगिर, शुभांगी चव्हाण, विशाल भुजबळ, अनिल लखन,सचिन सरपटा, किशोर आठवाल व कर्मचारी आदी प्रमुख उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *