अरविंद सावंत, डॉ. निलमताई गोऱ्हे आणि सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार…
स्व. बाबासाहेब धुमाळ शिष्यवृत्ती योजना धनादेश वाटप…

पिंपरी, पुणे (दि.२५ ऑगस्ट २०२२):- शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने मागील २२ वर्षांपासून उद्धव श्री पुरस्कार देण्यात येतो. यामध्ये विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या नागरिकांचा उद्धव श्री पुरस्कार समितीच्या वतीने गौरव करण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार समारंभ मंगळवारी (दि. 30 ) सायंकाळी पाच वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे या भूषविणार असून पुरस्कार वितरण माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच यावेळी स्व.बाबासाहेब धुमाळ शिष्यवृत्ती योजना अंतर्गत धनादेशाचे वाटपही करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना उपनेते व पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक रवींद्र मिर्लेकर, आमदार व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर, पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख वैभव थोरात आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष, संयोजक माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी दिली.

शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निमंत्रक इरफान सैयद, सचिव गुलाब गरुड, युवराज कोकाटे, गणेश आहेर, माधव मुळे, विजय गुप्ता, हाजी मणियार आदी उपस्थित होते.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख स्वर्गीय बाबासाहेब धुमाळ यांच्या प्रेरणेतून दरवर्षी उद्धव श्री पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या सत्कारमूर्ती मध्ये पद्मश्री मुरलीकांत पेटकर तसेच श्रीकांत बडवे, डॉ. स्मिता जाधव, अक्षय बाहेती, आर. आर. थोपटे, मुबारक खान, श्रीमती प्रभा शिवनेकर, विजय यादव, रामदास कुदळे, धनंजय डोंजेकर, रमेश पाचंगे, संतोष साळुंखे, मिलिंद कांबळे, मेहबूब शेख, बाबू नऱ्हे, आकांक्षा पिंगळे यांचा समावेश आहे.

यावेळी प्रदेश संघटक गोविंद घोळवे, शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, गटनेते राहुल कलाटे, संघटिका सुलभा उबाळे तसेच वैशाली मराठे, धनंजय आल्हाट, अनंत कोराळे प्रमोद भावसार, अनिकेत घुले, प्रतीक्षा घुले, राजन शर्मा, मुकेश फाले, सुनील सावरकर, मंगल घुले, अनिता तूतारे, मीनल यादव, रेखाताई दर्शले, अश्विनी वाघमारे, अमित गावडे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी समितीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी मंत्री दिवाकर रावते, सुभाष देसाई, शशिकांत सुतार आदींसह प्रमुख मान्यवरानी उपस्थिती लावली आहे. तसेच उद्योगपती व माजी खासदार राहुल कुमार बजाज, उद्योजक बाबा कल्याणी तसेच भय्यू महाराज, खडीवाले वैद्य, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, युवा कलाकार भूषण कडू आदींसह अनेक मान्यवरांना संयोजन समितीच्या वतीने उद्धव श्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे, अशी माहिती संयोजन समितीचे सचिव गुलाब गरुड यांनी यावेळी दिली.
…………………………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *