आयुक्तांकडून पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन…
पिंपरी चिंचवड दि.२४ :- नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांचा सत्कार पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व सोशल मीडियाच्या वतीने महानगरपालिकेतील भा.वि.कांबळे पत्रकार कक्षात नुकताच करण्यात आला.कार्याध्यक्ष नाना कांबळे यांनी पत्रकारांच्या मागण्या या वेळी मांडल्या त्याला अनुसरून पत्रकार भवनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.
या वेळी आयुक्त सिंह म्हणाले की, पत्रकार आणि प्रशासन गाडीच्या चाका प्रमाने असून सर्वच चाके महत्वाचे आहेत. आपणास आमचे सहकार्य असतेच आपलेही सहकार्य असले तर महानगरपालिके मार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा या चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. अनेक मुद्दे आपण लक्षात आणून देता हे चांगले आहे.टिकेचा माझ्यावर परिणाम होत नाही. विरोधी पक्षाची भूमिका मिडिया निभावत असतो. परंतू विरोध चांगल्या पद्धतीचा असला तर आपण त्यात सुधारणा करू शकतो. पत्रकार भवनाची मुख्य मागणी दिसत असून ती लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल.
या वेळी उपायुक्त रविकिरण घोडके , पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अरुण उर्फ नाना कांबळे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, सरचिटणीस प्रविण शिर्के, सोशल मीडिया अध्यक्ष सुरज साळवे, महीला अध्यक्ष शबनम सय्यद, उपाध्यक्ष माधुरी कोराड, पत्रकार पितांबर लोहार, अजय कुलकर्णी, विनायक गायकवाड, प्रशांत साळुंखे, गणेश मोरे,अशोक कोकणे, देवा भालके, महावीर जाधव, संतोष गोतावळे, सिद्धांत चौधरी, दिलीप देहाडे, मारुती बानेवार, मुझफर इनामदार, सिताराम मोरे, रेहान सय्यद, अर्चना मेंघडे, सीता जगताप,अविनाश आदक, राजु वारभुवन, राकेश पगारे इत्यादि उपस्थित होते.
स्वागत अध्यक्ष अनिल वडघुले व प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ यांनी केले.आभार पत्रकार मारुती बाणेवार यांनी मानले.