सन्माननीय राजेश पाटील हे ओरिसा राज्यातील इंदूर शहरात कार्यरत होते.इंदूर शहराप्रमाणे पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ सुंदर व सुशोभित करण्याचा निर्धार केला. त्यादृष्टीने त्यांनी कठोरपणे पावले टाकली. त्यासाठी आरोग्यासह सर्वच विभागांना त्यांनी सोबत घेतले. शहरातील सर्व कचराकुंड्या त्यांनी गायब केल्या ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीसह प्लॉगेथॉन व स्वच्छागृह मोहिमेची सुरवात केली. विविध सामाजिक संस्थांना व महिला बचत गटांना सार्वजनिक शौचालय साफसफाईची जबाबदारी दिली. तसेच अस्वच्छता करणाऱ्या दंडात मोठी वाढ करत कारवाई केली. शहरातील सर्वच मुख्य चौकात टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक कलाकृती बनवून चौक सुशोभीकरण केले. पदपथांची रंगरंगोटी केली.
शहरातील कोणताही नागरिक आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये याकरिता शहरात राजमाता जिजाऊ यांच्या नावे २५ जिजाऊ क्लिनिक सुरु करण्याची नवीन संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. तसेच वैद्यकीय सेवेसाठी भोसरी, आकुर्डी ,थेरगाव व जिजामाता हे नवे ४ रुग्णालय सुरु केले.
पिंपरी चिंचवड शहरातील अनाधिकृत बांधकामावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. तसेच जाहिरात होर्डिंगचे नवे धोरण आणून अनधिकृत होर्डिंग हटवण्यात आले. भ्रष्टाचार करणाऱ्या अनेक ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई केली,अनेक ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.
आजपर्यंत या व्यवस्थेने ज्यांना प्रवाहाच्या बाहेर ठेवले होते अश्या तृतीयपंथी घटकाला मुख्य प्रवाहात आणून तृतीयपंथी व्यक्तींना नोकरीत सामावून घेतले.त्यांना अनेक महत्वाच्या ठिकाणी सामावून घेऊन आयुक्त राजेश पाटील यांनी ऐतिहासिक असा बदल घडवून आणला.
शिक्षणाशिवाय प्रगती होऊ शकत नाही याची जाणीव आयुक्त राजेश पाटील यांना असल्यामुळे त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात अनेक ग्रंथालय वाचनालय सुरु केले,अनेक विविध शैक्षणिक क्लासेस मोफत सुरु केले, पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी पुण्यात जावे लागते म्हणून शहरात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. पिंपरी चिंचवड शहरात ७५ झोपडपट्टी आहेत अश्या सर्व झोपडपट्टीतील मुलांसाठी वाचनालय ग्रंथालय निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प होता. असे अनेक प्रक्लप त्यांनी अवघ्या १८ महिन्यात राबविले.
१८ महिन्याच्या कालावधीत त्यांनी पिंपरी चिंचवड शहरात असे अनेक प्रकल्प राबविले ज्यामधून शहराचा दर्जा व नावलौकिक प्रचंड वाढीस लागला होता. विकासाभिमुख व सर्वांगीण घटकांचा विचार व विकास करणारे कार्यक्षम अधिकारी म्हणून राजेश पाटील यांची जनमानसात ओळख निर्माण केली होती. राजेश पाटील यांच्यामुळे भष्टाचारी व बेकायदेशीर राजकारणी ठेकेदार यांना चाप बसला होता परंतु राज्यात सत्तांतर झाले व या सत्तांतराचा फायदा घेत राजकीय सूडबुद्धीने त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली त्यांच्या या बदलीने सामान्य माणसांत, विद्यार्थी, तृतीपंथी संघटना,अनेक सामाजिक राजकीय संघटना यांच्याकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. कार्यक्षम अधिकारी राजेश पाटील यांच्या राजकीय सूडबुद्धीने केलेल्या बदलीचा ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एम.आय.एम) पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.