भोसरी :- गुरूवार दिनांक २१ जुलै २०२२ रोजी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक  मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी, भोसरी येथे  कीर्तन महोत्सवात भोसरीचे प्रथम आमदार मा. श्री विलास विठोबा लांडे यांचे आई- वडील ह भ प स्व.विठोबा सोनबा लांडे व स्व. इंदुबाई विठोबा लांडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात काल्याच्या कीर्तनाची सेवा हभप केशव महाराज उखळीकर यांनी समर्पित केली.
या कीर्तन महोत्सवात श्री विलास लांडे यांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सुवर्ण मंदिर, श्री क्षेत्र भंडारा डोंगर जीर्णोद्धारासाठी देणगी देण्याचे आवाहन केले त्याला प्रतिसाद म्हणून अनेक दात्यांनी या महोत्सवात सढळ हाताने देणगी दिली.श्री सुधीर मुंगसे यांनी ५१ लाखांची देणगी जाहीर केली.
काल्यांच्या कीर्तनात  प्रबोधन करताना हभप केशव महाराज उखळीकर यांनी गोपाळकृष्ण व त्यांचे सवंगडी यांच्या अद्वैत रूपाची महतीचे निरूपण केले. देवापेक्षा हे संत मोठे त्यांची मानसिकता विशाल ज्यांनी त्यांना त्रास दिला त्यांना देखील बरोबर घेऊन जातात. नशिब बदलायला विठ्ठल नाम घेऊन टाळी वाजवावी परोक्ष ‌ज्ञान व अपरोक्ष. ज्ञान हे ज्ञानाचे दोन प्रकार. गवळीणी ह्या कृष्णाच्या खोड्या सांगतात, अहम मरत नाही. सगुणरूपाचे दर्शन यशोदे ला झाले  संतांचे चित्त  लोण्यासारखे शुद्ध. कृष्णा चरित्रातून राधा वजा करता येत नाही. देव भक्तांची काळजी घेतो. भक्तींच्या पोटी प्रेम असते.
भोसरीचे प्रथम आमदार मा श्री विलास लांडे म्हणाले माझ्या वडिलांची मिराशी गा देवा—- तुझी चरण सेवा पांडुरंग— आई वडिलांनी ठेवलेला संप्रदायाचा आदर्श, दिलेले संस्कार हीच आमची खरी संपत्ती. आई वडिलांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त परिसरातील भाविकांनी या कीर्तनसेवेचा आनंद घेतला. दररोज वेगळ्या वेगळ्या महाराजांनी कीर्तन सेवा समर्पित केली.
कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी  ह.भ.प .पुरुषोत्तम महाराजांनी विशेष योगदान दिले . मा. श्री विलास लांडे ,सौ मोहिनी ताई लांडे ,मा.श्री विश्वनाथ लांडे सौ. संगीताताई लांडे , सौ हिराबाई विठ्ठल मुंगसे, सौ.मिराबाई हिरामण गोडसे, सौ.मिराबाई मारुती गुजर, श्री विक्रांत लांडे,सौ.शुभांगी लांडे, श्री विराज लांडे,सौ.कांचन लांडे, सौ. विनया सुधीर मुंगसे,सौ विशाखा आदित्य शिंदे हे लांडे परिवारातील सदस्य उपस्थित होते.
संस्थेचे सचिव मा श्री सुधीर मुंगसे खजिनदार व विद्यमान नगरसेवक मा श्री अजितभाऊ गव्हाणे, विश्वस्त श्री विश्वनाथ कोरडे, विश्वस्त व विद्यमान नगरसेवक पिं.चिं .मनपा मा.श्री विक्रांत लांडे , श्री गणेश शिंदे, गणेश सांडगे, भालचंद्र जगताप, दिलिप बेगडे,मा.परदेशी, विकास ढगे पाटील, जालिंदर शिंदे, संजय वाबळे सर्व विश्वस्त मंडळ  श्री शशी आखाडे, हभप बाळासाहेब काशीद महाराज, माणिकराव जैद, पंकज भालेकर, प्राचार्य.उपप्राचार्य, विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक साकोरे यांनी केले तर  सौ शुभांगी विक्रांत लांडे आभारप्रदर्शन करताना म्हणाल्या१४  जुलै पासून आजपर्यंत सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवाला उपस्थित असलेले वारकरी संप्रदायाने आप्तेष्टांनी आमच्यावर पुत्रवत प्रेम केलेले भाविकांच्या या प्रेमामुळे आम्ही सर्वजण भारावून गेलो आहोत वारकरी संप्रदायाची पताका पुढे नेण्यासाठी आम्ही लांडे कुंंटुंबीय कटिबद्ध आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *