शहराध्यक्ष श्री. अजित दामोदर गव्हाणे यांनी महाविकास आघाडी मधील मा. उद्धवजी ठाकरे साहेब, मा.अजितदादा पवार,मा.छगनजी भुजबळ साहेब व मा.बापूसाहेब थोरात सर्वांचे ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर आभार मानले तसेच ओबीस सेल अध्यक्ष श्री. विजय लोखंडे यांनी शहराध्यक्ष व पदाधिकारी यांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला व ओबीसी सेल महीला अध्यक्ष सारिका पवार यांनी सुप्रिम कोर्टच्या निर्णयाचे स्वागत तसेच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त केले.
यावेळी महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट, माजी नगरसेवक सतीशदादा दरेकर, माजी नगरसेविका संगीता नानी ताम्हाणे, युवक इम्रान शेख, कविताताई खराडे, सचिन आवटे, पिके महाजन, काशिनाथ जगताप, दत्तात्रय जगताप, विकास साने, प्रकाश आल्हाट, उत्तम आल्हाट, आनंदा कुदळे, सतिश चोरमले, विशाल जाधव, विशाल आहेर, अलंकार हिंगे, तुकाराम बजबळकर, समिता गोरे, रासकर मॅडम, वाघोले मॅडम, तुषार ताम्हाणे इत्यादी मान्यवरांचा आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.