पिंपरी:- कोरोना महामारीच्या 2 वर्षाच्या कालखंडानंतर अगदी जोशात व भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा पार पडणार आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावतीने यावर्षीच्या पालखी सोहळ्यातील जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखी रथाच्या मखरासाठी, सिंहासनासाठी व पादुकांसाठी जवळपास 15 किलो चांदी अर्पण करण्यात आली.
यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन महाराज मोरे, पालखी सोहळ्याचे प्रमुख व संस्थानचे विश्वस्त ह.भ.प.माणिक महाराज मोरे, ह.भ.प.संतोष महाराज मोरे, ह.भ.प संजय महाराज मोरे, ह.भ.प मधुकर महाराज मोरे यांना बोलवून यथोचित पूजा करून १५ किलो चांदी अर्पण केली. या चांदी पासून पालखी सोहळ्याच्या पादुका, सिंहासन, मखर, व अभिषेकासाठी लागणारी परात बनविण्यात येणार आहे.
याप्रसंगी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त यांच्या सोबत शेखर कुटे, गुलाब कुटे,रमेश बापू लांडगे, अनिरुद्ध मोरे,संजय ढमाले,सतीश लांडगे,संजय औसरमल, शशिकांत घुले, संदीप चिंचवडे, नीता ढमाले, सचिन वाल्हेकर व सिध्दार्थ बनसोडे उपस्थित होते.