प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनसेवा हेल्पलाईन नंबर जारी…
पिंपरी : – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील तब्बल २५० गुणवंत व्यक्तींचा मनोज भाऊ जरे युवा मंच व नारी शक्ति महिला मंच द्वारे रविवारी (दि.२९ मे) “समाज भूषण” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शहराध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजितभाऊ गव्हाणे, महिला शहराध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कविताताई आल्हाट व मनोज भाऊ जरे यांच्या हस्ते पुरस्कारार्थीना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ८३९०९०९०३३ हा जनसेवा हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला.चिखली म्हेत्रे वस्ती येथील म्हेत्रे उद्यानात सायंकाळी सात वाजता प्रभागातील नागरीकांच्या तुफान गर्दीत हा कार्यक्रम पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन अजितभाऊ गव्हाणे, कविता आल्हाट,योगेश बहल,तुषार हिंगे, सुरेश म्हेत्रे, संगीता ताम्हाणे, वसंत जरे ज्येष्ठ उद्योजक,विशाल मुर्हे,पंकज भालेकर, यश साने उपस्थित होते.
या वेळी श्रीलालबाबू गुप्ता,सचिन भाऊ जरे, महेश होरे,संदीप नेवाळे, युवराज पवार, नेताजी काशीद, सर्जेराव भोसले, धनंजय भालेकर,बबन म्हेत्रे,शिवलिंग जरे, पाणी पुरवठा अधिकारी बावीस्कर साहेब, सामाजिक कार्यकर्ते अशोक भोर,विपुल म्हेत्रे संजय ताम्हाणे,आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी अजित गव्हाणे म्हणाले की, ‘मनोज भाऊ जरे यांनी सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला हे कौतुकास्पद आहे. सन्मान केलेल्यांना काम करण्याची उभारी मिळणार आहे. या भागात स्वर्गीय दत्ता काका साने यांनी अनेक समाजहिताची कामे केली त्यांच्या पावलावर पाऊल टाकत जरे कुटुंबेही समाज हिताची कामे करायला मागे राहणार नाही याची मला खात्री आहे. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी आज जनसेवा हेल्पलाइन नंबर जारी केला त्यामुळे प्रभाग क्रमांक १३ मध्ये विकास होणार हे निश्चित झाल आहे.’
मनोज जरे म्हणाले की,. ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित झालेल्यांचे अभिनंदन करतो. आपल्या अवतीभवती अनेक लोक कोणतीही अपेक्षा न करता समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी काम करत असतात. समाजाच्या विकासात पर्यायाने शहराच्या विकासात या लोकांची मोलाची मदत मिळत असते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळे प्रभागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे याचा विचार करून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनसेवा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे काही समस्या असल्यास नागरिकांनी या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन जरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री बाळासाहेब काळजे पाटील यांचा मराठी गाण्याचा मनोरंजनात्मक “दौलत महाराष्ट्रची” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याचा नागरिकांनी आस्वाद घेतला. या वेळी प्रभागातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनोजभाऊ जरे युवा मंच आणि नारी शक्ती यांनी परिश्रम घेतले. स्वागत मनोजभाऊ जरे आणि निलिमा ताई जरे यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता तरते व प्रतिभा पाटील यांनी केले तर आभार संजय शिंदे, विजय जरे यांनी मानले.