चिंचवड :- ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा.तुकाराम दादा पाटील यांच्या हस्ते कवयित्री मा. प्रज्ञा घोडके यांच्या “स्वप्न बिलोरी” या पाचव्या काव्यसंग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून कवी बाबू डिसोजा, नर्मदा परिक्रमा करणारे रवी जोशी होते.
नवयुग संस्थेचे संस्थापक श्री राज अहेरराव, अध्यक्ष राजेंद्र घावटे यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारिणीच्या सदस्य रजनी अहेरराव, उज्ज्वला केळकर, वर्षा बाल गोपाल यांनी सुरेल आवाजात कविता म्हणून प्रकाशनाची उत्सुकता वाढविली. मा. कैलास भैरट, प्रदीप गांधलीकर, नंदकुमार गुमास्ते यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. कवयित्री प्रज्ञा घोडके यांनी माहेरची आठवण काढली. त्या चाफळ च्या म्हणून श्रीरामांची कृपा आहे असे म्हटले. पिंपरी चिंचवडच्या साहित्यिका माधुरी डिसोजा, वंदना इन्नानी, सुप्रिया लिमये, कांचन नेवे, योगिता कोठेकर, जयश्री गुमास्ते तसेच शेजारी, नातेवाईक हजर होते.
माधुरी ओक यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नेटकेपणाने सूत्रसंचालन केले. दत्तात्रय घोडके, ऐश्वर्या घोडके यांनी संयोजन परिश्रम घेतले.