मोशी :- श्री. वसंतराव (नाना) लोंढे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन
पिंपरी (दि.१७ मार्च २०२२) जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन दिवस तुकाराम बीज म्हणून भक्ती भावाने नामस्मरण करीत विविध धार्मिक कार्यक्रमाने सर्वत्र साजरा केला जातो.

भोसरी संत तुकाराम नगर येथे पाण्याच्या टाकी जवळ श्री. वसंतराव (नाना) लोंढे प्रतिष्ठानच्या वतीने जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांचे मंदिर २० ऑक्टोबर २०२१ उभारण्यात आले आहे. या मंदिरातील मुर्तीची प्रतिष्ठापना शांतीब्रम्ह हभप मारोती महाराज कु-हेकर आणि कलशारोहण हभप केशव महाराज उखळीकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

तुकाराम बीज निमित्त या ठिकाणी शनिवारी (दि.१९ मार्च) दुपारी ३ वाजता ४५ भजनी मंडळांचा सहभाग असणारी दिंडी काढण्यात येणार आहे. भोसरी आळंदी रोड, संत तुकाराम नगर पाण्याच्या टाकी जवळ मंदिरापासून भोसरी आळंदी रोड – दिघी रोड परिसरात दिंडीचा मार्ग असेल. हभप पुरुषोत्तम महाराज पाटील आणि हभप सोपान महाराज फुगे यांच्या हस्ते दिंडीचे प्रस्थान होईल. तसेच रविवारी (दि.२० मार्च) सकाळी ६ वाजता जगद्‌गुरु तुकाराम महाराज मंदिरात अभिषेक; भजन १० ते १२ आणि १२ वाजता वैकुंठ गमन सोहळा आणि मंदिरावर पुष्पवृष्टी; सायंकाळी ७ ते ९ हभप समाधान महाराज शर्मा यांचे हरिकीर्तन आणि महाप्रसाद अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
———————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *