फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून सूरज बाबर यांचे संघटनेत स्वागत…
पिंपरी (दि. १४ मार्च २०२२) :- ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाॅप किपर्स फेडरेशनची पुण्यात नुकतीच आढावा बैठक पार पडली. सर्वप्रथम शिवसनेचे माजी खासदार तथा ऑल महाराष्ट्र शॉपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष स्व. गजाननजी बाबर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीत महत्वाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी स्व. गजानन बाबर यांचे चिरंजीव सुरज गजानन बाबर यांनी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शाॅपकिपर्स फेडरेशनचे सभासदत्व स्वीकारले. याप्रसंगी जनरल सेक्रेटरी बाबुराव म्हमाणे, अशोक जयवंतराव एडके, खजिनदार विजय गुप्ता, शहाजी लोखंडे, मोहन चौधरी, विक्रम छाजेड, शाहुराज गायकवाड आणि राज्य फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सूरज बाबर यांचे संघटनेत स्वागत केले.
गेली सतरा वर्षे राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी बाबर साहेबांनी जीवाचे रान केले. त्यासाठी मोठा लढा उभा केला. त्यातून राज्यभरातील ५५ हजार रेशन दुकानदारांना सुखाचा घास मिळवून दिला. बाबर साहेबांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांचे वारस सूरज बाबर यांच्या पाठीशी संघटना ठामपणे उभी राहील, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.