विस्डम करिअर एज्युकेशन प्रा. लि. कंपनीचे वाकड येथे पुणे कार्यालय सुरु…
पिंपरी:- जागतिकीकरणाच्या खुल्या अर्थव्यवस्थेमुळे अनेक उद्योग व्यवसायांना चालना मिळाली आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनाही देशात परदेशात अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध होत आहेत. या उद्योग व्यवसायांना पूरक ठरणा-या हॉटेल उद्योगात देखिल लाखो इंटर्नशिपसाठी नवनविन संधी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विस्डम करिअर एज्युकेशन प्रा. लि. कंपनी २००८ सालापासून कार्यरत आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय नवी मुंबई येथे असून परदेशात यूएसए, मलेशिया, फ्रान्स आणि गोवा, नवी मुंबईत, पुण्यात कार्यालये आहेत. कंपनीच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत पाच हजारांहून जास्त विद्यार्थ्यांना देशातील प्रमुख उद्योग, व्यवसायात इंटर्नशीपसाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच यूएसए, कॅनडा, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोपसह जगभरातील अनेक देशांमध्ये बाराशेंहून जास्त विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसा त्या विद्यापीठांशी सांमजस्य करार करण्यात आला आहे.
आता वाकड येथिल नवीन शाखेच्या माध्यमातूनही आणखी उत्कृष्ट सेवा देण्यासाठी कंपनीचे संचालक मंडळ प्रयत्नशील राहिल असे प्रतिपादन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन शेंडगे यांनी केले. विस्डम करिअर एज्युकेशन प्रा. लि. कंपनीही विद्यार्थ्यांना परदेशात इंटर्नशिप आणि उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करणारी राज्यातील नामांकित कंपनी आहे. या कंपनीच्या वाकड शाखेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते शनिवारी (दि. २६ फेब्रुवारी) करण्यात आले. यावेळी नगरसेवक राहुल कलाटे, नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले, नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन अमित गोरखे, डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेटमेंटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मिलिंद पेशवे, एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य वैभव फंड, कंपनीचे संचालक अश्विनी शेंडगे, सुयोग शेलार, दिप्ती पगारे, ज्योती भट, प्रियांका सैनी, प्रशांत धस, प्रिती धस आदी उपस्थित होते. हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी परदेशात इंटर्नशीप च्या मार्गदर्शनासाठी विस्डम करिअर एज्युकेशन प्रा. लि. शॉप नं. २०९, येथील सर्व्हे क्र. १६३/३, वाकड, हिंजवडी पुलाजवळ, देहूरोड – कात्रज बायपास, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या जवळ वाकड, पुणे ४११०५७ महाराष्ट्र. फोन नं. ९७२३४३९७००. येथे संपर्क साधावा असे आवाहन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन शेंडगे यांनी केले आहे.
————————