‘मी रावेत डिस्ट्रिक्ट’ हा गृहप्रकल्प रावेतची नवी ओळख ठरेल..

पिंपरी (दि.२६ फेब्रुवारी २०२२) पिंपरी चिंचवड शहरात उद्योग, व्यवसाय करीत असताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन उत्तरदायित्व निभावण्यात ‘आसवाणी प्रमोटर्स ॲण्ड बिल्डर्स’ चे संचालक आसवाणी बंधू नेहमीच अग्रेसर असतात. कोरोना महामारीच्या काळात आसवाणी बंधू यांनी उपेक्षित, वंचित समाज घटकांना मदतीचा हात दिला. तसेच दोन वेळा रक्तदान शिबीर घेऊन सामाजिक जबाबदारी निभावली. या कोरोना काळात वैद्यकीय आणि पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा कर्तव्य बजावत होते. या कोरोना योध्द्यांचा योग्य सन्मान करुन त्यांना अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त रावेत सारख्या निसर्गरम्य आणि वेगाने विकसित होणा-या परिसरात ‘मी रावेत डिस्ट्रिक्ट’ या प्रकल्पात पाच लाख रुपयांची सवलत देणारे आसवाणी बंधू हे एकमेव उद्योजक आहेत असे प्रतिपादन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.

रावेत मधिल सर्वात मोठ्या ‘मी रावेत डिस्ट्रिक्ट’ या गृहप्रकल्पाचे उद्‌घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २४ फेब्रुवारी) करण्यात आले. उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात ‘द बॅच ऑफ ऑनर’ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, तुषार हिंगे, माजी नगरसेवक जगदिश शेट्टी, तुकाराम भोंडवे, उल्हास शेट्टी, प्रशांत शेट्टी, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे, डॉ. प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर, बाळकृष्ण सावंत, श्रीराम पोळ, वसंत बाबर, पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण आदींसह कोरोना योध्दे उपस्थित होते.

आसवाणी प्रमोटर्स ॲण्ड बिल्डर्सचे संचालक श्रीचंद आसवाणी यांनी स्वागत करताना सांगितले की, वैद्यकीय आणि पोलिस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी कोविड योध्द्यांना या गृहप्रकल्पात पाच लाख रुपयांची सवलत देण्यात येणार आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सरकारी, निमसरकारी रुग्णालये तसेच खाजगी रुग्णालये आणि पोलिस प्रशासनातील कर्मचा-यांनी सवलतीचा लाभ घ्यावा असेही आवाहन श्रीचंद आसवाणी यांनी केले आहे.

रावेत मध्ये सर्व्हे नं. १४९ आणि १५० बीआरटी लिंकरोड, एसबी पाटील पब्लिक स्कूलच्या जवळ निसर्गरम्य परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कुटुंबातील सर्वांसाठी पन्नासहून जास्त अत्याधुनिक सुविधा या प्रकल्पात आहेत. आयटी पार्क, शैक्षणिक संस्था, व्यापारी संकुल, रस्ते, रेल्वे स्टेशन, महामार्ग, बीआरटी रस्ता, मॉल, रुग्णालये, एमआयडीसी असा सर्व ठिकाणी दळणवळणाची उत्तम सुविधा या प्रकल्पाला आहे. ४५ मिटर बीआरटी रस्त्यावर प्रकल्पाचे प्रवेशव्दार आहे. हा प्रकल्प २७ एकर जागेत उभा राहणार असून रावेत मधिल सर्वात मोठा गृहप्रकल्प आहे. २७ एकर मधिल सुमारे १२ एकर जागेवर ५० पेक्षा जास्त अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. या मधिल पहिल्या फेजच्या चार इमारतींमध्ये ३५० सदनिकांमध्ये २ बीएचके ८६० स्वे. फुट आणि ३ बीएचके ९८० स्वे. फुट पासून पुढे सदनिका आहेत अशीही माहिती उद्योजक श्रीचंद आसवाणी यांनी यावेळी दिली.
————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *