भाजपाला भोसरीमधून पहिला झटका नगरसेवक वसंत बोराटे यांचा राजीनामा…

पिंपरी:- पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग रचना जाहीर होताच भाजपचे धाबे दणालले. निवडणुकीच्या तोंडावरच सत्ताधारी भाजपला झटके बसायला सुरुवात झाली. पहिला झटका शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या भोसरीतून बसला आहे. प्रभाग क्रमांक दोन मोशी-जाधववाडी भागाचे प्रतिनिधित्व करणारे वसंत बोराटे यांनी भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे.

प्रभागाच्या विकासासाठी सहकार्य केले नाही आणि पक्षात काम करताना स्वाभिमान दुखावला जात होता असे सांगत वसंत बोराटे यांनी आज (बुधवारी) महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपला पहिला झटका बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *