पिंपरी चिंचवड महापालिकामध्ये “फ्रिडम टू वॉक अँड सायकल चॅलेंज फॉर सिटी शपथेचे सामुहिक वाचन”…
पिंपरी:-पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनाच्या आवारामध्ये फ्रिडम टू वॉक अँड सायकल चॅलेंज फॉर सिटी बाबतच्या शपथेचे सामुहिक वाचन तसेच सध्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ च्या माध्यमातून महापालिकेतर्फे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये महापालिका अधिकारी कर्मचार्यांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे. यादृष्टीने हरित शपथ आणि स्वच्छता शपथेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी आयुक्त राजेश पाटील अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, श्रीकांत सवने, संदेश चव्हाण, मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.