पिंंपरी :- स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व माजी खासदार गजानन बाबर यांना संभाजीनगर, शाहूनगर, शिवतेजनगर, पूर्णानगर व फुलेनगर वासीयांच्या वतीने संभाजीनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
स्वा. सावरकर प्रतिष्ठान व मित्र मंडळ आणि गुरुदत्त सेवा मंडळ या संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परिसरातील शोकाकुल नागरिक , मंडळांचे पदाधिकारी व सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी “दीदी” व “भाऊ” यांच्या आठवणींना उजाळा दिला. नगरसेविका अनुराधा गोरखे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, मधुकर बाबर, प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजाभाऊ मस्के, उपाध्यक्ष अनिल गोडसे, दिलीप सावंत, शिवसेना संपर्क प्रमुख योगेश बाबर, ऊपशहर प्रमुख पांडुरंग पाटील, गोपीचंद जगताप, ज्ञानेश्वर पाटील, संदीप चव्हाण, संदीप थोरात, भास्कर पवार, दिलीप पाटील, शिवतेज प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिपान मंगवडे, संजय ढेम्बरे, दिलीप देशमुख, नामदेव पोटे यांनी श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले. व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी लताबाईं व माजी खासदार बाबर यांच्या कार्याला उजाळा दिला.
दत्ता पटवेकर, राजेंद्र हरेल, मंडळाचे अध्यक्ष संजय कुरबेट्टी, उपाध्यक्ष विनोद रामाने, प्रसाद ढमढेरे, शांताराम पवार, चंद्रकांत बावळे, अजित भालेराव यांनी संयोजन केले. सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी केले. दिवंगत अभिनेते रमेश देव, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गिरीश वैद्य यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
लताबाईंच्या आवाजातील पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.