राष्ट्रीय ‘इलेक्ट्रिक फॉर्म्युला भारत 2022’ रेसिंग स्पर्धेत पीसीसीओईचा प्रथम क्रमांक
पीसीईटीच्या यशात आणखी एक मानाचा तुरा

पिंपरी, पुणे (दि. ४ फेब्रुवारी २०२२):-  वेगाने वाढत जाणा-या प्रदुषणामुळे आगामी काळात अवघी सजीव सृष्टी धोक्यात येण्याची भिती आहे. यावर जगभरातील संशोधक अभियंते योग्य पर्याय शोधतील असा आशावाद पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) ‘क्रेटॉस रेसिंग इलेक्ट्रिक टिम’ ने कोईम्बतुर येथे झालेल्या ‘इलेक्ट्रिक फॉर्म्युला भारत 2022’ या राष्ट्रीय फॉर्म्युला रेसिंग स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवरील एकूण आठ पारितोषिके पटकावून स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. या टिमचा आणि मार्गदर्शक प्राध्यापकांचा सत्कार लांडगे यांच्या हस्ते पीसीईटीच्या प्रांगणात शुक्रवारी (दि. ४ फेब्रुवारी) करण्यात आला. यावेळी टिम क्रेटॉस इलेक्ट्रिक टिमचे सर्व यशस्वी विद्यार्थी, पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, यांत्रिक विभाग प्रमुख डॉ. पद्माकर देशमुख, मार्गदर्शक प्रा. निलेश गायकवाड आदी उपस्थित होते.ज्ञानेश्वर लांडगे यावेळी म्हणाले की, पेट्रोल, डिझेल सारख्या इंधन वापरामुळे तापमानात आणि प्रदुषणात वाढ होत आहे. त्याचा परिणाम निर्सगाचे हवामान चक्र बदण्यावर होत आहे. परिणामी भविष्यात अवघी सजीव सृष्टी धोक्यात येण्याची भिती आहे. त्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक कार हा पर्याय ठरु शकतो. यावर संशोधक अभियंते योग्य पर्याय शोधतील यासाठी शासन देखील प्रोत्साहन देत आहे असे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.

कोईम्बतूर येथे कारी मोटर्स स्पिडवे यांनी (दि. 21 ते 25 जानेवारी 2022) इलेक्ट्रिक फॉर्म्युला स्पर्धा आयोजित करण्यात केल्या होत्या. यामध्ये देशभरातून नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी भाग घेतला होता. यामध्ये पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) टिम क्रेटॉस इलेक्ट्रिक टिमने ओव्हर ऑल गटात प्रथम क्रमांक, इंजिनीरिंग डिझाईन, इंडयुरन्स, कॉस्ट आणि मॅनुफॅक्टअरिंग, ओवरऑल स्टॅटिक, इलेक्ट्रिक इफिसिएंशी, ओवरऑल डायनामीक अवार्डमध्ये प्रथम आणि बिझनेस प्लॅन गटामध्ये पाचवा क्रमांक अशी एकूण आठ पारितोषिके पटकावून पीसीसीओईने ‘इलेक्ट्रिक फॉर्म्युला भारत 2022 ’च्या चषकावर आपले नाव कोरले.उच्च तंत्रज्ञान व संशोधनाव्दारे मानवी जीवनस्तर अधिक उंचावण्यासाठी पीसीईटीच्या सर्व महाविद्यालयातून ‘प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगला’ प्रोत्साहन व विविध तांत्रिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. यापुर्वी 2016, 17 आणि 18 मध्ये सलग तीन वर्षे क्रेटॉस रेसिंग टिमने सुप्रा एसएई इंडिया या राष्ट्रीय नामांकित स्पर्धेत प्रथम क्रमांकाची हॅट्रीक केली आहे.तसेच 2019 व 2021 मध्ये इलेक्ट्रिक फॉर्म्युला भारत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला होता. या टिमचे नेतृत्व मानस कोल्हे याने केले अशी माहिती मार्गदर्शक प्रा. निलेश गायकवाड यांनी यावेळी दिली.
या टिम मध्ये अभिषेक जाधव, अभिषेक भोसले,अभिषेक त्रिपाठी, अमन गोणकर, अनिश पिंजण, अनिकेत वराडे, आशुतोष जंगम, अथर्व हूड, चिन्मय तिजारे, चिराग खर्चे, गौरी देशमुख, ह्रिषीकेश कदम, जयेश निकम, कनिका पंडिता, मयूर पाटील, नेहा पाटील, ओहम दशमुखे, प्रदयनेश घिवारी, प्रणव कोलते, प्रणव कुमार राम नंनवानी, प्रणव महाजन, प्रथम कुरेकर, प्रथमेश आरकेरीमठ, प्रथमेश पाटील, राधेशाम नेमाडे, राहुल अडिप्पा, राज पेशवाणी, रौनक संमन्वर, रोहन पाटील, ऋतुराज येवले, साक्षी गव्हाणे, सम्मेद वनकुद्रे, समृद्धी बोरा, शौनक चौधरी, शुभंकर जामदार, स्वराज शेवाळे, तनया पाचपुते, तेजस खैरनार, वेदांत जगताप, यशवर्धन सिन्हा आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
———————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *