पिंपरी:– पिंपरी येथील दुकानदारांकडून खंडणी गोळा केल्याच्या आरोपाखाली मा. उपमहापौर, नगरसेवक- केशव घोळवे यांच्यासह तीघांना पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी उपमहापौर डब्बू आसवाणी यांच्या नावाने काही लोक पैसे गोळा करत असल्याची तक्रार होती. काही व्यापाऱ्यांनी आसवाणी यांना त्याबाबत विचारणा केली असता त्यांनाही धक्का बसला. त्यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्यानंतर भाजपा नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह गुड्डू यादव यांच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली, असे पोलिस सुत्रांनी सांगितले.

पिंपरी रेल्वे पुलाजवळील जागेत दुकाने मिळवून देतो असे सांगेत दुकानदारांकडून पैसे गोळा केल्याच्या आरोपाखाली भाजपा नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह तीघांना पोलिसांनी मध्यरात्री अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
गुड्डू उर्फ प्रमोद पोलिसांनी घनःशाम यादव, मलका यादव, हसरत अली शेख यांना अटक केली आहे.

महंमद तय्यबअली शेख यांनी या प्रकऱणाती फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेट्रो स्टेशन जवळील जागेत जे नेपाळी लोकांचे मार्केट आहे त्या दुकान मालकांना पुनर्वसनात पक्के गाळे मिळणार असे सांगून पैसे गोळा करण्यात आले. १०० लोकांना गाळे मिळवून देतो असे सांगून भाजपा कामगार आघाडी या संघटनेकडे २०१९ पासून दरवर्षी १२०० रुपये प्रमाणे पैसे गोळा कऱण्यात आले. दुकान मिळवून देतो असे सांगून ५५००० रुपये घेतले आणि पुन्हा एक लाखाची मागणी कऱण्यात आली. पैसे दिले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, असे पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादित म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी उपमहापौर डब्बू आसवाणी यांच्या नावाने काही लोक पैसे गोळा करत असल्याची तक्रार होती. काही व्यापाऱ्यांनी आसवाणी यांना त्याबाबत विचारणा केली असता त्यांनाही धक्का बसला. त्यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्यानंतर तपसाची चक्र फिरली आणि मध्यरात्री तीन वाजता भाजपा नगरसेवक केशव घोळवे, गुड्डू यादव यांच्यासह आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली, असे पोलिस सुत्रांनी सांगितले.

आसवाणी यांच्याकडे विचारणा केली असता, होय आठवड्यापर्वी चार-पाच व्यापारी माझ्याकडे आले होते. प्रत्येकाकडून ८५ हजार रुपये या प्रमाणे सुमारे १०० व्यापाऱ्यांकडून ८५ लाख रुपये गोळा कऱण्यात येत असून त्यासाठी डब्बू आसवाणी यांचे नावे पैसे गोळा कऱण्यात येत आहेत, असे त्यांनी मला सांगितले होते. मलाही धक्का बसला, कारण मी एकाही व्यापाऱ्याकडून एक रुपया कधी घेतलेला नाही. त्यामुळे मी लेखी तक्रार केली. पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास केला आणि तत्काळ कारवाई केली.

2017 महापालिका निवडणुकीत घोळवे मोरवाडी, संभाजीनगर प्रभागातून भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. भाजपने त्यांना उपमहापौरही केले होते. कामगार नेते म्हणूनही ते परिचित आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थक अशी ओळख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *