पिंपरी :– पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. तळवडे येथून प्रभागाला सुरुवात होणार असून शेवटचा प्रभाग सांगवी असेल. १३९ नगरसेवक संख्येसाठी तीन सदस्यांचे ४५ तर चार सदस्यांचा एक प्रभाग सांगवीचा आहे. प्रभागाची किमान लोकसंख्या ३२ हजार तर कमाल लोकसंख्या ४० हजार आहे. अनुसूचित जातीसाठी २२ तर अनुसूचित जमातीसाठी ३ जागा राखीव आहेत. ११४ जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत.

महापालिकेच्या नगरसेवक संख्येत ११ ने वाढली आहे. पूर्वी १२८ होती ती आता १३९ झाली आहे. या प्रभाग रचनेकडे नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. नवा प्रभाग कसा असेल, त्याला कोणता भाग जोडला असले, कोणता भाग वगळला असेल याबाबत कमालीची उत्कंठा आहे. महापालिकेची सन २०१७ मधील निवडणूक चार नगरसेवकांचा एक प्रभाग या पद्धतीने झाली. सध्या शहरात ३२ प्रभाग आहेत. आता तीनसदस्यीय पद्धतीनुसार ४६ प्रभाग होतील. त्यातील ४५ प्रभाग तीन नगरेसवकांचे तर एक प्रभाग चार नगरसेवकांचा असेल. प्रभागाचा कच्चा आराखडा तयार करताना प्रगणक गट, प्रभाग दर्शविणाऱ्या खुणा निश्चित केल्या जाणार आहेत. हा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर त्यामध्ये ५० वेळा सुधारणा करण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जातींसाठी (एससी) १६ टक्के आरक्षण आहे. त्यामुळे १३९ सदस्यांच्या महापालिका सभागृहात २२ सदस्य असतील. त्यात महिला व पुरुष सदस्यांची संख्या ११ असेल. २९,१९,२०,२२,४३,११,३७,१८,२९,३४,१६,३५,१७,४४,३९,३२,४६,४१,१४,२५,३८,३३ हे २२ प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. तर, अनुसूचित जमातीसाठी (एसटी) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन टक्के आरक्षण आहे. त्यानुसार सध्यस्थितीत अनुसूचित जमातीतील सदस्य संख्या तीनच राहणार आहे. त्यांच्यासाठी प्रभाग ४१, ५ आणि ६ हे आरक्षित असतील. ते दिघी, भोसरी आणि पिंपळे – गुरव असे असतील.

प्रभागाची किमान लोकसंख्या ३२ हजार तर कमाल लोकसंख्या ४० हजार अशी आहे. सर्वात कमी लोकसंख्या प्रभाग ३७ ची असून ती ३२ हजार ६६४ अशी आहे. तर सर्वाधिक लोकसंख्या तळवडे प्रभागाची असून ती ४० हजार ७६७ अशी आहे.तसेच, चार सदस्यीय प्रभाग असलेल्या सांगवीतील लोकसंख्या ४६ हजार ९७९ अशी आहे.

असे असतील नगरसेवक
प्रवर्ग आणि संख्या
१) अनुसूचित जाती : २२
२) अनुसूचित जमाती : ३
३) खुला : ११४
————————
एकूण : १३९

असे असते आरक्षण
प्रवर्ग आणि टक्केवाराी
१) अनुसूचित जाती : १६ टक्के
२) अनुसूचित जमाती : ३ टक्के
३) खुला : ११४
————————
एकूण : १००

१) लोकसंख्या (२०११) : १७ लाख २७ हजार ६९२
२) अनुसूचित जातीची लोकसंख्या : २ लाख ७३ हजार ८१० (१५.८४ टक्के)
३) अनुसूचित जमातीची लोकसंख्या : ३६ हजार ५३५ (२.११ टक्के)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *