पिंपरी :- वाकड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली “श्री फाउंडेशन” व “वाकड पोलिस स्टेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६/०१/२०२२ रोजी, वेळ सकाळी ७:३० ते ११:३० वाजेपर्यंत, प्रजासत्ताक दिनानिमित्त वाकड पोलिस स्टेशन येथे मोफत आरोग्य शिबीर व चष्मे वाटप करण्यात आले. आरोग्यामध्ये जनरल चेकअप, हाडांची तपासणी, दातांची तपासणी, डोळ्याची तपासणी करण्यात आली. यावेळी जनरल फिजिशियन डॉक्टर रवींद्र द्विवेदी आणि डॉक्टर संतोष नगरकर, हाडांचे डॉक्टर विष्णू नांदेडकर, दातांचे डॉक्टर आरती गांधी, तर ऑप्टीशीयन श्रद्धा खामकर यांनी जवळपास ७८ (पोलीस, शांतता सदस्य, दक्षता सदस्य, वरिष्ठ नागरिक) लोकांची तपासणी केली. यावेळी श्री फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष- सुशांत पांडे, प्रशांत जाधव, दादाराव आढाव, मदन जोशी, संतोष बोरले, अविनाश रानवडे, आदींनी परिश्रम घेतले. तसेच वाकड पोलिस स्टेशनचे डॉ. विवेक मुगलीकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), श्री. संतोष पाटील (गुन्हे पोलीस निरीक्षक), श्री. अभिजीत जाधव (तपास पथक पोलीस उपनिरीक्षक) श्री घाडगे (पोलीस निरीक्षक), श्री. अनिल लोहार (पोलिस उपनिरीक्षक), श्री. अविनाश पवार (पोलीस उपनिरीक्षक), श्री. ठाकूर (पोलीस उपनिरीक्षक) श्री. गणेश तोरगल (पोलीस सहनिरीक्षक) श्री. अवधूत शिंगारे (पोलीस सहनिरीक्षक) श्री. दीपक काडमाने (पोलीस सहनिरीक्षक), हवलदार श्री. दिपक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. विवेक मुगलीकर व संतोष पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात केली डॉक्टर विवेक नांदेडकर यांनी हाडांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले, तसेच श्री फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष श्री. सुशांत पांडे यांनी सर्वांचे आभार मानले.