पुणे :- कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सर्जिकल स्ट्राईक चे जनक, परम विशिष्ट सेवा मेडल, उत्तम युद्ध सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल, सेना मेडल (दोन वेळा), विशिष्ट सेवा मेडल, अशा अनेक पुरस्काराने सन्मानित, जनरल राजेंद्र निंभोळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी ग्रीन थंब चे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले व कर्नल लक्ष्मण साठे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले, कर्नल PK अग्रवाल, इंडियन वेटरन चे अध्यक्ष भोला सिंग, फ्लाईंग ऑफिसर AK मंडल, कॅप्टन गोविंद कंगणे, पत्रकार उदय पवार, वॉरंट ऑफिसर KC कौशिक, सुभेदार शांताराम जाधव , सुभेदार अजितराव निंभाळकर, सुभेदार संजय नाळे, एअरफोर्स चे प्रकाश सतपती, सुभाष मुरकुटे सर, AK रोडे सर, वॉरंट ऑफिसर मदन ठाकूर, माजी सैनिक संदीप बागुले, पत्रकार हर्षवर्धन पवार, सुभेदार रमेश गायके, WO A. अरुण, माजी सैनिक US सिंग, मा श्री. दिपक खांदवे, प्रकाश पालांडे, रोहिदास माळी, पांडुरंग शिंदे, मुकेश पाटील, माजी सैनिक शिवाजी गावडे साहेब, अरविंद जाधव साहेब आदी. माजी सैनिक व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डिझिटल म्युजिक चे अमोल देशपांडे व अमित देशपांडे, पूजा मोरे, ओंकार मोरे यांनी देशभक्तीपर गीते सादर केली व कावेरी इंटरनॅशनल स्कुल चे डान्स टीचर वरून शर्मा यांनी अप्रतिम कथक डान्स सादर केला व कीर्ती डान्स अकॅडमी च्या मुलांनी मनमोहक नृत्य सादर केले तसेच साई अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी परेड सह विविध कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन साई अकॅडमीचे संचालक, सैनिक फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष, शंभुसेना प्रमुख दिपक राजे शिर्के व मा. बाबासाहेब जाधव यांनी केले.