– प्रभाग क्रमांक एकमध्ये १८ मीटर रुंद डीपी रस्त्याचे भूमिपूजन…
– महापौर उषा उर्फ माई ढोरे, शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती…

पिंपरी | प्रतिनिधी:-
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला यश मिळाले. नागरिकांनी दिलेला हा विश्वास सार्थ ठरवत समाविष्ट गावांचा कायापालट करण्याचे एकमेव उद्दिष्ट भाजपाने समोर ठेवले त्याचीच परिणीती म्हणजे आता समाविष्ट गावांमध्ये रस्त्यांची गंगोत्री अवतरली आहे , असे मत ‘फ’ प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड यांनी मंगळवारी व्यक्त केले.

प्रभाग क्रमांक १ चिखली येथील १८ मीटर रुंद डीपी रस्त्याचे भूमिपूजन मंगळवारी पार पडले. शहराच्या प्रथम नागरिक उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार महेश लांडगे उपस्थित होते. कार्यक्रमाला पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, नगरसेविका स्विनल म्हेत्रे, साधना मळेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते किशोर वायकर, सुरेश म्हेत्रे व ग्रामस्थ उपस्थित होते.

फ-प्रभाग अध्यक्ष गायकवाड यावेळी म्हणाले की, समाविष्ट गावांचे योगदान लक्षात घेत भाजपाने सत्ता मिळाल्यानंतर या गावांचा कायापालट करण्याचा अक्षरश: चंग बांधला. आणि त्याची परिणीती समाविष्ट गावांमध्ये दिसत आहे. चांगले रस्ते, पाणी आणि मूलभूत आरोग्याच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *