पिंपरी ‘:- महात्मा जोतिबा फुले मंडळाच्या वतीने दरवर्षी शहरामध्ये उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांना “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले” पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२२ या वर्षी पुरस्कारासाठी 22 महिलांची निवड करण्यात आली. सदर पुरस्कार सोहळा सोमवार दि. ३ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे संपन्न झाला.
याप्रसंगी शिर्डी संस्थानच्या सी.ई.ओ. भाग्यश्री बानायत यांचा हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले २०२२ “पत्रकार भूषण” पुरस्कार माधुरी कोराड यांना देण्यात आला. सदर पुरस्कार सोहळ्यासाठी खासदार मा. श्रीरंग बारणे, महापौर सौ. माई ढोरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते.
महात्मा जोतिबा फुले मंडळ, चिंचवड अध्यक्ष हणमंत माळी (यादव) यांनी प्रास्ताविक मध्ये मंडळाबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी हिरामण भुजबळ, सुर्यकांत ताम्हाणे, नरहरी शेवते, अनिल साळुंखे, विजय दर्शले, कैलास पेरकर यांनी परिश्रम घेतले.