कॉंग्रेसच्या वर्धापनादिनानिमित्त ‘कॉंग्रेस चषक 2021’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

पिंपरी (दि.28 डिसेंबर 2021):- कॉंग्रेस पक्षाने क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राचा नेहमी सन्मान केला आणि प्रोत्साहन दिले आहे. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर आणि ज्येष्ठ सिने अभिनेत्री रेखा यांच्या सारख्या अनेक खेळाडू आणि कलाकारांची राज्यसभा तसेच विधान परिषदेवर सदस्य म्हणून कॉंग्रेसने निवड केली आहे. भारतातील युवक, युवतींना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र तसेच भारतीय महिला क्रिकेट संघात उपेक्षित व वंचित घटकातील महिला खेळाडूंना संधी मिळाली आहे. कॉंग्रेसचे क्रीडा विषय असणारे हेच धोरण पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम शहरात राबवित आहेत. डॉ. कदम यांच्या निवडीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे असे प्रतिपादन पुण्याच्या माजी महापौर व माजी आमदार दिप्ती चवधरी यांनी केले.

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या वर्धापनादिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने ‘कॉंग्रेस चषक 2021’ भव्य डे नाईट हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संत तुकाराम नगर पिंपरी येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेतील महिला गटाच्या स्पर्धेचे उद्‌घाटन दिप्ती चवधरी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, माजी महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, सद्‌गुरु कदम, निर्मला कदम, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, दिनकर भालेकर, महिला नेत्या छायाताई देसले, नंदाताई तुळसे, स्वाती शिंदे, सायली नढे, अनिता अधिकारी, सुप्रिया पोहरे, ज्येष्ठ नागरिक सेलचे माजी अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, ज्ञानेश्वर मलशेट्टी, हिराचंद जाधव, सुनिल राऊत, के. हरी नारायणन, सौरभ शिंदे, आबा खराडे, विश्वनाथ जगताप, निखिल भोईर, किरण नढे, इस्माईल संगम, नयन पालांडे, रवी नांगरे, प्रकाश पठारे, किरण खाजेकर, प्रा. संजय पवार आदी उपस्थित होते.

मंगळवारी कॉंग्रेसच्या 136 व्या स्थापनादिनानिमित्त डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते खराळवाडी पिंपरी येथे ध्वजारोहन करण्यात आले. क्रिकेट स्पर्धेच्या उद्‌घाटन प्रसंगी स्वागत, प्रास्ताविक करताना डॉ. कैलास कदम म्हणाले की, शहरात एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणात एखाद्या पक्षाच्या वतीने प्रथमच क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत एकूण 48 संघाना सहभागी करुन घेण्यात आले आहे. प्रथम विजेत्या संघास कॉंग्रेस चषक 2021 आणि 44,444 रुपयांचे, व्दितीय संघास 33,333 रुपयांचे, तृतीय संघास 22,222 रुपयांचे आणि चतृथ संघास 11,111 रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच मॅन ऑफ सिरीज, बेस्ट बॅटमन, बेस्ट बॉलर यांना देखील स्मृती चिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व संघांना सन्मान चिन्ह आणि अंतिम चार संघांतील खेळाडूंना टि शर्ट भेट देण्यात येणार आहे.

सुत्रसंचालन नरेंद्र बनसोडे, आभार विरेंद्र गायकवाड यांनी केले.
—————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *