पिंपरी:- एसके बापू भालेकर फौंडेशनच्या वतीने रूपीनगर तळवडे परिसरातील मुलांना शिवकालीन इतिहास माहिती व्हावा या हेतूने सिंहगडाची सफार घडवून आणली. सुमारे दीड हजार बाळगोपाळांनी या सहलीचा आनंद लुटला.

कार्यसम्राट आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक-शांताराम बापू भालेकर यांच्या पुढाकाराने या सहलीचे आयोजन केले होते. रुपीनगर तळवडे प्रभाग क्रमांक १२ या भागांमधून सिंहगडावर बालमावळे जाण्यासाठी सकाळी सहा वाजता शांताराम बापू भालेकर यांच्या संपर्क कार्यालय समोर नियोजना साठी जमले होते. मार्गस्थ होण्यापूर्वी सकाळी ८ वाजता बालगोपाळानी पुजा केली. उत्साही बाल मावळे गडावर जाण्यासाठी प्रचंड उत्सूक होते. यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरून एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.

शिवकालीन ऐतिहासिक गडाची सफर करण्यासाठी या भागातील नागरिक मोठ्या संख्येने नागरीक सहभागी झाले होते. पूजेदरम्यान भाजपचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, धनंजय वर्णेकर, किरण पाटील, हणुमंत कलमोरगे, मोहन शेवाळे, कमलेश भालेकर, सीताराम पोटफोडे, विलास अबुज, बबन (राजेंद्र) भालेकर, रामभाऊ भालेकर, संपत भालेकर, संतोष निकाळजे, अशोक कोकणे, बाळु तुपे, विष्णू बाबर,नंदु मोरे, प्रदीप करगोटे, सजित मुलानी, श्रीयश भालेकर, निलेश भालेकर, शकिल शेख, विनोद वैरागी, अमोल गवळी,रुशभ पाटील, केतन पाटील, मयुर बोडके, गोकुळ कदम,शुभम सदानंद,अभिशेख वरर्णेकर,विश्वजीत कदम, राजेश सुर्वेसे, अजीत भालेकर, रोहित दाभाडे अभिजीत गिरी, निसर्ग पवार, विनोद इंगळे, विनोद वैरागी, सिद्धांत वरुटे, अमोल गवळी, योगेश गुजर, हर्षद मुल्ला, ऋषिकेश थिगळे, केदार थिगळे,, संभाजी लोंढे, आर्यन थिगळे, राजू सुरवसे, प्रिन्स सिंग, अमर गायकवाड, शुभम ढगे, अमोल गवळी, तेजस ढगे, अक्षय मदने, स्वप्निल तेली, अलका अहिरे, रीना सपकाळ,वैशाली भालेकर, मंगल भालेकर स्वाती थिगळे शुभांगी थिगळे,महानंदा बरगे अंजली गायकवाड, उज्वला भालेकर, सारिका भालेकर आदी मान्यवर सहभागी झाले होते.

हि सहल यशस्वी करण्यासाठी एस के बापू फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *