निगडी :- अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला भूमीगत वाहिन्यांचा प्रश्न आ. महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शांताराम बापू भालेकर व आमदार महेश दादा लांडगे यांच्या स्वखर्चातून शुभारंभ करून प्रश्न मार्गी लावण्यात आला.
रुपीनगर मधील अनेक वर्षांपासुन प्रलंबीत धोकादायक विद्युत तारांचा प्रश्न मार्गी लागला. रुपीनगर मधील संगम हौ सोसायटी व विकास हौ सोसायटी मधील उघड्यावर असणाऱ्या विद्युत वाहिन्यांचा त्रास येथे रहाणाऱ्या जवळपास ३००० नागरीकांना सातत्याने होत होता . घरापासुन हाताच्या अंतरावर असणाऱ्या विद्युत तारा अत्यंत धोकादायक होत्या. हा प्रश्न नागरिकांच्या जीवावरदेखील बेतू शकत होता. पावसाळा किंवा वादळी वारा यासारख्या आपत्तीमध्ये नागरिकांच्या डोक्यावर अक्षरशः टांगती तलवारच होती. नागरीकांनी वारंवार तक्रारी केल्या अनेक वेळा निवेदने सादर केली , परंतु यावर काहीच तोडगा निघाला नाही . तत्काळ हा प्रश्न नागरीकांनी भारतीय जनता पार्टी रुपीनगर -तळवडे मार्फत आमदार महेशदादा लांडगे यांच्या पुढे मांडला असता त्यावर आमदार महेश दादांनी स्वखर्चाने मुख्य ३.५ x ३०० sq mm आल्युमिनिअम आरमड ची ५०० मिटर म्हणजे १६०० फूट केबल व नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांनि २ कोर ४ sq mm आरमड केबल व त्यासाठी लागणार LT मिनी फिडर पिलर ४००अम्पिअर क्षमतेचे ८ बॉक्स स्वखर्चाने दिले.
त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला मोफत विज जोडणी करून मिळेल. सदरचे काम हे महावितरण तर्फे न करता मा महेश दादा लांडगे व मा शांताराम बाप्पू भालेकर (SK बाप्पू) यांच्या स्वःखर्चातुन करण्यात येणार आहे . महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन या कामाची सुरवात रुपीनगर मधील नागरीकांच्या हस्ते नारळ फोडुन करण्यात आली. त्या प्रसंगी स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, मा नगरसेवक रघुनंदन घुले, रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव एस डी भालेकर, रुपीनगर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कॅप्टन कदम साहेब, घरजाई माता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण वाळुंजकर, सचिव बंडू राणे, उपाध्यक्ष गौतम मोकाशी, बळीराम गोळे, बाबुराव गाडे, केंब्रिज स्कूल चे अध्यक्ष धनंजय वर्णेकर सर, संगम सोसायटीचे चेअरमन हनुमंत जाधव, मुरलिधर भालशंकर, सुखदेव नाना म्हस्के, राजाराम खरे, बाळू मिठे, रफिक नदाफ, बाळाराम उत्तेकर, विश्वास मोरे, मामा जाधव, पीएसआय भिंगवडे साहेब, भाजपाचे शिवाजी बोडके, शिरीष भाऊ उत्तेकर, दादा सातपुते,किरण पाटील, विनोद भाऊ नवले, विक्रम दादा हिवरे, अनिल भालेकर, अण्णा गवळी, रविराज शेतसंधी, मधुकर सोनगिरे, सागर चव्हाण, साजिद मुलाने, शाम भालेकर , रामदास गवारे, रोहिदास भालेकर, हनीफ मुल्ला साहेब, राजेंद्र खोल्लम, दीपक शिंदे, सोमनाथ मेमाने, रामदास कुटे, मयूर बोडके, केतन पाटील, वसंत शिंपी, पंढरीनाथ भालेकर, हणमंत कलमोरगे, भिवाजी थोरात, राजाराम अप्पा भालेकर, दत्तात्रय कुंभार, रामदास गवारे, सुदाम मुळीक, दत्ता चव्हाण, समीर जगताप, दीपक बोर्डे, बाळू तुपे, राजा भाऊ तापकीर, बाळू मिठे, बबन भालेकर, मधुकर भालेकर, संतोष शिंदे, सचिन गायकवाड, अशोक कोकणे, मंगेश नखाते, अजित जाधव, सद्दाम नदाफ, सुनील आमणे, विकास सकपाळ, दाभाडे साहेब, शंकर खुटाळे, मीनल बेले, सीमा गायकवाड, संगीता काळे, वैशाली भालेकर, शीतल वरणेकर, मंगल भालेकर, पूजा खरे, सीमा खरे, भालशंकर ताई, शितल साल्ढाणा, तसेच महावितरणचे ज्युनिअर इंजिनिअर हुलसुलकर साहेब आणि त्यांचे कर्मचारी उपस्थित होते.