पिंपरी  दि.२४ नोव्हेंबर:-  संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्याचे काम पिंपरी विधानसभा मतदारसंघात आमदार बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून सातत्याने सुरू आहे.  त्याचाच एक भाग म्हणून 30 पेक्षा अधिक लाभार्थ्यांना आमदार बनसोडे यांच्या हस्ते  मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. यापूर्वी देखील शेकडो लोकांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे.

सदर योजने मध्ये निराधार पुरुष व महिला अनाथ मुले , अपंगातील सर्व प्रवर्ग क्षयरोग, कर्करोग, एडस, कुष्ठरोग या सारख्या आजारामुळे  स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष महिला , निराधार विधवा, घटस्फोट झालेल्या परंतु पोडगी न मिळालेल्या महिला, देवदासी, ३५ वर्षा वरील अविवाहित महिला तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी  या सर्वाना या योजनेचा लाभ मिळतो.  लोकांना दरमहा एक हजार ते बाराशे रुपये अनुदान म्हणून बँक अकाउंटला जमा होतात.

या वेळी आमदार बनसोडे यांनी संजय गांधी निराधार समिती चे अध्यक्ष आनंद बनसोडे यांच्या कडून योजना  व लाभार्थ्यांची  माहिती घेतली व पुढील काळात जास्तीत जास्त गरजू निराधार लोकांपर्यत शासन योजना पोहचवावी यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश लांडगे,रेणुका भोजने, आशा शिंदे,रजनिकांत गायकवाड ,मल्हार आर्मी शहराध्यक्ष दीपक भोजने यांच्यासह  संजय गांधी निराधार समिती चे अध्यक्ष आनंद बनसोडे,सदस्य चंद्रकांत कांबळे, अब्दुल शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *