लकी ड्रॉ स्पर्धेतील पहिल्या सात विजेत्यांना आकर्षक ७ बक्षिसे, प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक साडी भेट देण्यात येणार…
पिंपरी :- भोसरी विधान सभा मतदार संघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यमान नगरसेवक, माजी क्रीडा समिती सभापती- लक्ष्मण सस्ते यांच्यावतीने रमेश परळीकर प्रस्तुत ‘वहिनी पुन्हा एकदा होम मिनीस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेय. यामध्ये लकी ड्राँचे आयोजन करण्यात आले असून, लकी ड्रॉ स्पर्धेतील पहिल्या सात विजेत्यांना आकर्षक ७ बक्षिसे देण्यात येणार आहेत. शिवाय, प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक साडी भेट देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम शुक्रवार दि.२६ नोव्हेंबर २१. सायं. ६ वा. शिवाजीवाडी, मोशी येथील नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांच्या निवासस्थानाशेजारी आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम हा कोरोना विषाणूच्या संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून होणार आहे. सदर कार्यक्रमात विजेत्यांना प्रथम क्रमांकास सोन्याचे नेकलेस व पैठणी, दुसऱ्या क्रमांकास सोन्याचे कानातील दागिने तिसऱ्या क्रमांकाचा सोन्याची अंगठी, चौथ्या क्रमांकाच्या विजेत्या फ्रिज, पाचवा क्रमांक विजेत्यास पिठाची गिरणी, चाव्या विजेत्यास ओव्हन, तर सातवा क्रमांक असणाऱ्या विजेत्यास वॉटर प्युरिफायर असे मोठ्या किमतीचे बक्षिसे ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित राहून भरपुर आनंद घ्यावा आणि बक्षिसांची लयलूट करावी असे आवाहन नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांनी केले आहे.