शिव शाहू शंभो उद्यान हजारो दिव्यांनी उजळले…

पिंपरी :- आरंभ सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित दीप संध्या कार्यक्रमात बहारदार गीते आणि सुरेल गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. या निमित्ताने प्रज्वलित केलेल्या हजारो दिव्यांनी संभाजीनगर येथील शिव शाहू शंभो उद्यान उजळून निघाले.

चिंचवड संभाजीनगर येथील शिव शाहू शंभो उद्यानात रविवारी, दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी दीप संध्या कार्यक्रम पार पडला. यावेळी नागरिकांच्या सहभागाने संपूर्ण उद्यानात एक हजार दिवे प्रज्वलित करून दिपोत्सव करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रसिध्द पार्श्वगायिका सावनी रविंद्र यांच्यासह प्रसिध्द गायक अक्षय घाणेकर, मकरंद पाटणकर, रुपाली घोगरे, प्रशांत साळवी यांच्या बहारदार गीत गायनाने रसिक मंत्रमूग्ध् झाले.

कार्यक्रमाचे मुख्य संजोजक मा. उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक तुषार हिंगे आणि आरंभ आरंभ सोशल फाउंडेशनच्या संचालिका सोनाली तुषार हिंगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी नगरसेविका अनुराधा गोरखे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, जेष्ठ नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *